ही आहेत वास्तुकला आणि संस्कृतीचा मिलाफ असलेली प्राचीन मंदिरे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 03:48 PM2019-11-19T15:48:34+5:302019-11-19T16:17:28+5:30

जगभरात अशी शेकडो मंदिरे आहेत जी पौराणिक वास्तुकला आणि संस्कृतीची उत्तम उदाहरणे आहेत. यापैकी काही हिंदू आणि बौद्ध मंदिरे तर भारताबाहेरही आहेत. आज जाणून घेऊयात अशा मंदिरांविषयी

इसवी सनपूर्व १३ वर्षांपूर्वी इजिप्तपमध्ये हे मृतांचे मंदिर उभरण्यात आले होते. इथे मृतदेह ठेवले जात. स्थानिक पौराणिक देवता असलेल्या अमून याला हे मृतदेह अर्पित केले जात असत.

आज हे मंदिर भग्नावस्थेत असलेल तरी त्याचे भग्न अवशेष सिंकंदराच्या काळातील ग्रीसच्या भव्यतेची साक्ष देत उभे आहेत. अथेन्स नावाच्या देवीच्या सन्मानार्थ हे मंदिर उभारण्यात आले होते.

इसवी सन ६८३ च्या सुमारास उभारण्यात आलेले हे मंदिर प्राचीन माया संस्कृतीशी निगडीत आहे. इजिप्तच्या बाहेरील पिरॅमिडच्या आकाराचे हे सर्वात मोठे बांधकाम आहे.

या मंदिराचे पहिले बांधकाम कधी झाले याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नाही. मात्र इसवी सन ६४९ मध्ये या मंदिराचा दुसऱ्यांदा जिर्णोद्धार झाला होता. एकेकाळी देशातील सर्वांत श्रीमंत मंदिर असा लौकिक असेले हे मंदिर अनेक परकीय आक्रमकांची शिकार झाले. त्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यावर ९१५१ मध्ये या मंदिराचे पुनर्निर्माण झाले.

नवव्या शतकात या महायान बौद्ध मंदिराचे बांधकाम करण्यात आले होते. या मंदिरात सुमारे ५०० हून अधिक बौद्ध मूर्ती आहेत.

नवव्या शतकाच्या मध्यावर संजया या हिंदू साम्राज्यातील राजांनी हे मंदिर बांधले. ४७ मीटर उंच असलेले हे मंदिर वास्तुकलेचा उत्तम नमुना मानले जाते.

अंग्कोरवाट हे जगातील सर्वात मोठ्या मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर ख्मेर जारा सूर्यवर्मन द्वितीय याने बांधले.

कर्नाटक राज्यात असलेले हम्पी मंदिर १४ व्या शतकात बांधण्यात आले होते. मात्र इतिहासकारांच्या मते यापैकी काही बांधकामे ही इसवी सनपूर्व कालखंडातील आहेत.

१५ व्या शतकात राजा सुपुष्पा याने पशुपतिनाथ मंदिराचे पुनर्निर्माण केले. ११ व्या शतकातील एका ग्रंथानुसार येथे यापूर्वीही मंदिर होते.

अयुतथाया सामाज्याच्या काळात १३ ते १७ व्या शतकादरम्यान या मंदिराचे बांधकाम करण्यात आले होते. हे बौद्ध मंदिर सूर्याला समर्पित आहे.

१६ व्या शतकात अमृतसरमध्ये एका गुरुद्वाराचे बांधकाम करण्यात आले होते. मात्र या गुरुद्वाराने अनेक हल्ले झेलले होते. अखेरीस १८०३ मध्ये महाराजा रणजित सिंग यांनी या मंदिराचे सुशोभिकरण करण्याचा निर्णय घेतला. तसेच या मंदिरासाठी आपल्या खजिन्यातील सोने दान केले.