जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 16:15 IST2025-06-29T16:12:20+5:302025-06-29T16:15:05+5:30

Most Dangerous Roads In The World: प्रवास करणं, नवनवी ठिकाणं पाहणं हे प्रत्येकालाच आवडतं. काही ठिकाणी आपण प्रवासातील सुगमतेमुळे सहजपणे जाऊ शकतो. मात्र काही ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला अवघड रस्ते पार करावे लागतात. या रस्त्यांवरून जाण्यात वेगळाच थरार असला तरी तिथून प्रवास करणं हे बऱ्यापैकी धोकादायक असतं. आज आपण जगातील पाच सर्वात धोकादायक रस्त्यांवर नजर टाकूया. यामधील एक रस्ता चक्क आपल्या भारतात आहे.

प्रवास करणं, नवनवी ठिकाणं पाहणं हे प्रत्येकालाच आवडतं. काही ठिकाणी आपण प्रवासातील सुगमतेमुळे सहजपणे जाऊ शकतो. मात्र काही ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला अवघड रस्ते पार करावे लागतात. या रस्त्यांवरून जाण्यात वेगळाच थरार असला तरी तिथून प्रवास करणं हे बऱ्यापैकी धोकादायक असतं. आज आपण जगातील पाच सर्वात धोकादायक रस्त्यांवर नजर टाकूया. यामधील एक रस्ता चक्क आपल्या भारतात आहे.

डेथ रोड म्हणजे मृत्यूचा मार्ग या नावावरूनच या रस्त्याच्या भयानकतेची आपण कल्पना करू शकतो. हा मार्ग दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हिया येथे आहे. या रस्त्याची गणना जगातील सर्वात धोकादायक मार्गामध्ये होते. तसेच येथील अरुंद आणि वळणावळणांच्या मार्गामुळे अपघात होऊन दरवर्षी येथे २०० ते ३०० लोकांचा मृत्यू होतो.

जोजी ला खिंड हा रस्ता काश्मीर आणि लडाख या दोन भागांना जोडतो. हा मार्ग हिमालयात अत्यंत उंचावर स्थित आहे. हिवाळ्यामध्ये हिमवृष्टीमुळे हा मार्ग बऱ्याचदा बंद असतो. वळणावळणांचा रस्ता आणि खोल दऱ्या यामुळे या मार्गावरून प्रवास करणं खूप जोखमीचं असतं. हा रस्ता सुमारे ३ हजार ५०० फूट उंचीवर आहे. तसेच याची लांबी ९ किमी एवढी आहे.

अफगाणिस्तानमधील हा मार्ग १४३ किमी लांब आहे. तसेच हा मार्ग पार करण्यासाठी जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. हा मार्ग दुर्गम पर्वतीय भागातून जातो, तसेच इथे बरीच तीव्र वळणं आहेत. दहशतवादी हल्ल्यांचा धोकासुद्धा या मार्गावरून प्रवास करताना पत्करावा लागतो.

तुर्कीएमधील ट्राब्जोन क्षेत्रात असलेला हा रस्तासुद्धा खूप खतरनाक मानला जातो. पर्वतीय भागातून जाणाऱ्या डी९१५ महामार्गावर कुठेही रेडिंग किंवा सुरक्षेसाठी भिंत उभारलेली नाही. या मार्गावर एकीकडे उंच पर्वत आहेत तर दुसऱ्या बाजूला खोल दरी आहे. त्यामुळे येथून प्रवास करत असताना थोडीशी चूक सुद्धा जीवघेणी ठरू शकते.

इजिप्तमधील हा रस्ता लक्सर आणि हुरघाडा यांना जोडतो. मात्रा या रस्त्यावरसुद्धा लुटारू आणि दहशतवाद्यांचा मोठा धोका नेहमी असतो. येथे नेहमीच लुटालूट, अपहरण, हत्या यासारख्या घटना घडत असतात. त्यामुळे येथून प्रवास करण धोकादायक ठरतं.