शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हॉस्पीटलला भयंकर आग! तरीही डॉक्टरांनी सर्जरी सुरुच ठेवली; वाचवले रुग्णाचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2021 5:21 PM

1 / 7
डॉक्टरांना आपण देवाचा दर्जा उगाच देत नाही. रशियामध्ये जीवाची बाजी लावून डॉक्टरांनी एका रुग्णाचे प्राण वाचवले आहेत. एका रुग्णावर ओपन हार्ट सर्जरी सुरू असतानाच रुग्णालयाला लाग लागली होती. (Photos: Reuters)
2 / 7
रॉयटर्स वृत्त संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, रशियातील एका हॉस्पीटलमध्ये डॉक्टर्स ओपन हार्ट सर्जरी करत होते. त्याचवेळी हॉस्पीटलला आग लागली. आग लागल्याची माहिती मिळाली असतानाही डॉक्टरांनी सर्जरी न थांबवता रुग्णावर उपचार केले आणि त्याचे प्राण वाचवले.
3 / 7
रशियाच्या मदत आणि पुनर्वसन मंत्रालयानं या घटनेसंदर्भात एक पत्रक जारी केलं आहे. 'आठ डॉक्टर आणि नर्सेसच्या एका टीमनं रुग्णाला सुरक्षित ठिकाणी हलविण्याआधी दोन तासांपर्यंत मोठ्या अडचणीत रुग्णावर उपचार केले आणि सर्जरी पूर्ण केली'
4 / 7
आग लागली तेव्हा डॉक्टर आणि नर्सेस रुग्णाला तसंच टाकून बाहेर पडू शकत होते. पण त्यांनी असं न करता सर्जरी पूर्ण केली आणि रुग्णाला वाचवलं.
5 / 7
रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉ.वॅलेन्टिन फिलाटोव्ह म्हणाले की, 'आमच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता आणि आम्हाला रुग्णाचे प्राण वाचवयाचे होते. बाय-पास हार्ट सर्जरी होती. ती अर्धवट सोडणं शक्य नव्हतं. सर्जरी पूर्ण झाल्यानंतर रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आलं'
6 / 7
याच दरम्यान रशियाच्या अग्निशमन दलानंही कठोर परिश्रम घेतले. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांनी रुग्णालयाच्या वरच्या बाजूस लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवलं. याचे काही व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत. यात जीवाची बाजी लावून अग्निशमन दलाचे कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येतं.
7 / 7
हॉस्पीटलमध्ये दाखल असलेल्या १२८ रुग्णांना तात्काळ दुसऱ्या हॉस्पीटलमध्ये हलविण्यात आलं. ज्या ठिकाणी आग लागली तो इमारतीचा अतिशय जुना भाग आहे. जो १९०७ साली तयार करण्यात आला होता. लाकडी छत असल्यामुळे आग वेगानं पसरली अशी माहिती अग्निशमन दलानं दिली.
टॅग्स :fireआगrussiaरशियाhospitalहॉस्पिटल