आश्चर्यच! या देशांमध्ये अजूनही धावत नाही रेल्वे
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 15:40 IST2020-06-07T15:03:16+5:302020-06-07T15:40:19+5:30
भारतासह अनेक प्रगत आणि मोठ्या देशांमध्ये रेल्वे ही वाहतुकीचा कणा बनली आहे. चीन, जपानसारख्या देशात तर बुलेट ट्रेनचा वापरही मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, आजही जगात असे अनेक देश आहेत जिथे अद्यापही रेल्वेचा वापर केला जात नाही.

मानवी जीवनाच्या प्रगतीसोबतच वाहतुकीची गतिमान साधने ही दळणवळणाचा अविभाज्य भाग बनली आहेत. त्यातील महत्त्वाचे साधन म्हणजे रेल्वे. भारतासह अनेक प्रगत आणि मोठ्या देशांमध्ये रेल्वे ही वाहतुकीचा कणा बनली आहे. चीन, जपानसारख्या देशात तर बुलेट ट्रेनचा वापरही मोठ्या प्रमाणात होत आहे.

मात्र, आजही जगात असे अनेक देश आहेत जिथे अद्यापही रेल्वेचा वापर केला जात नाही. या देशांमध्ये काही छोट्या, जलवेष्टित, अविकसित देशांसोबत काही विकसित देशांचाही समावेश आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या देशांच्या यादीत भारताच्या शेजारी असलेल्याही एका देशाचा समावेश आहे.

कुवेत
कुवेत - आखाती देशातील विकसित आणि श्रीमंत देशात कुवेतची गणना होते. मात्र या देशात रेल्वेसेवा अस्तित्वात नाही.

ओमान
ओमान - ओमान या देशातसुद्धा रेल्वे धावत नाही.

भूतान
भूतान - भारताशेजारील छोटा आणि सुंदर देश असलेल्या भूतानमध्येसुद्धा रेल्वेसेवा उपलब्ध नाही.

येमेन
येमेन - येमेनमध्येसुद्धा रेल्वे धावत नाही.

लीबिया
लीबिया - मध्यपूर्व आशियातील लीबियामध्येसुद्धा रेल्वेसेवा दिली जात नाही.

रवांडा
रवांडा - रवांडा या देशातदेखील रेल्वेसेवा नाही.

कतार
कतार - अरब राष्ट्रांपैकी एक श्रीमंत राष्ट्र असलेल्या कतारमध्ये रेल्वेसेवा अस्तित्वात नाही.

आईसलँड
आईसलँड - युरोपमधील आईसलँड या छोट्याशा देशातदेखील रेल्वेसेवा नाही.

पापुआ न्यू गिनी
पापुआ न्यू गिनी - पापुआ न्यू गिनी या देशातसुद्धा रेल्वे धावत नाही.

मकाओ
मकाओ - मकाओ या देशातसुद्धा रेल्वे धावत नाही.

माल्टा
माल्टा - माल्टा या छोट्या देशातसुद्धा रेल्वे धावत नाही.

हैती
हैती - कँरेबियन बेटांवरील एक छोटा देश असलेल्या हैतीमध्ये रेल्वेसेवा अस्तित्वात नाही.

सोमालिया
सोमालिया - सोमालिया या देशातही रेल्वे धावत नाही.

सुरीनाम
सुरीनाम - सुरीनाम या देशातसुद्धा रेल्वे धावत नाही.

नायजर
नायजर - या देशातसुद्धा रेल्वे धावत नाही.

सायप्रस
सायप्रस - सायप्रस हा छोटासा देश विकसित देश मानला जातो. मात्र येथे रेल्वेसेवा सुरू करण्यात आलेली नाही.

तुवालू -
तुवालू - देशातसुद्धा रेल्वेसेवा सुरू करण्यात आलेली नाही.

















