Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांचे पृथ्वीवर लँडिंग कसे झाले; पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 14:06 IST2025-03-19T13:47:43+5:302025-03-19T14:06:36+5:30

गेली ९ महिने अंतराळात घालवल्यानंतर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या आहेत. बुधवारी भारतीय वेळेनुसार पहाटे ३:२७ वाजता ते फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर उतरले.

अंतराळवीर सुनीता विल्यम्स आज पहाटे ३.२७ वाजता स्पेस ड्रॅगनमधून पृथ्वीवर पोहोचल्या. कॅप्सूल पाण्यात उतरताच, या ऑपरेशनमध्ये सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. कॅप्सूल पृथ्वीवर पोहोचताच, ते एका जहाजावर ठेवण्यात आले. बाजूचा हॅच उघडून चारही अंतराळवीरांना बाहेर काढण्यात आले.

कॅप्सूल फ्लोरिडा किनाऱ्यावर पोहोचल्यानंतर कॅप्सुलला जहाजाजवळ घेऊन गेले. सुनीता विल्यम्स आणि इतर अंतराळवीर ९ महिने अंतराळात राहिल्यानंतर परतले आहेत. क्रू-९ कमांडर निक हेघ हे ग्राउंड क्रूच्या मदतीने ड्रॅगन कॅप्सूलमधून बाहेर पडणारे पहिले होते. यानंतर, रोस्कोसमॉस अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह बाहेर आले.

सुनीता विल्यम्स यांना दोन नंबरला बाहेर काढण्यात आले. कॅप्सूलमधून बाहेर पडल्यानंतर त्या हात हलवताना दिसल्या. बुच विल्मोर हे कॅप्सूलमधून बाहेर पडणारे शेवटचे अंतराळवीर होते.

मंगळवारी अंतराळवीर अवकाशातून निघाले आणि १७ तासांच्या प्रवासानंतर पृथ्वीवर परतले. आता त्यांना ह्युस्टनला पाठवले जाईल जिथे त्यांना ४५ दिवसांसाठी पाठवले जाणार आहे.

इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरुन पृ्थ्वीच्या दिशेने कॅप्सूल निघाते होते तेव्हाचा हा फोटो आहे.

गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील सुनीता विल्यम्स यांच्या झुलासन गावातील लोक तिच्या सुरक्षित परतीसाठी प्रार्थना केली होती.

सुनीता विल्यम्स यांच्या गुजरातमधील गावात उत्सवाचे वातावरण होते. गावकऱ्यांनी फटाके फोडून दिवाळी साजरी केली .