जगातील सहा सर्वात डेंजरस पूल, चालताना पावलोपावली थरथरतात पाय, यापैकी १ आहे भारतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 14:52 IST2025-02-05T14:46:02+5:302025-02-05T14:52:54+5:30

Most Dangerous Bridges In The world: जगभरातील अनेक पुल हे त्यांच्या बांधकामातील आकर्षक डिझाइनमुळे ओळखले जातात. तर काही पूल असेही आहेत जे खतरनाक असण्यासोबत खूप प्रसिद्धही आहेत. या पुलांवरून प्रवास करणं हा थरारक अनुभव असतो. अशाच काही पुलांची माहिती खालील प्रमाणे.

जगभरातील अनेक पुल हे त्यांच्या बांधकामातील आकर्षक डिझाइनमुळे ओळखले जातात. तर काही पूल असेही आहेत जे खतरनाक असण्यासोबत खूप प्रसिद्धही आहेत. या पुलांवरून प्रवास करणं हा थरारक अनुभव असतो. अशाच काही पुलांची माहिती खालील प्रमाणे.

मलेशियामधील लँगकॉवी स्काय ब्रिज ६६० मीट उंचीवर आहे. हे जगातील सर्वात खतरनाक पुलांपैकी एक म्हणून ओळखलं जातं. दोन पर्वतांदरम्यान, असलेलं हे पूल उंचीची भीती वाटणाऱ्या लोकांसाठी खतरनाक अनुभव ठरू शकतं.

जगातील खतरनाक पुलांमध्ये समावेश असलेलं ट्रिफ्ट ब्रिज सुमारे १०० मीटर उंचीवर स्थित आहे. हे पूल समुद्रापासून १७० मीटर लांब आहे. आणि समुद्रसपाटीपासून तीन हजार मीटर उंचीवर स्थित आहे. या ब्रिजवरून तुम्ही हिमनगाला अगदी जवळून पाहू शकता.

नेपाळमधील हँगिंग ब्रिजसुद्धा खतरनाक पुलांपैकी एक आहे. हे पूल खूपच अरुंद आहे. तसेच नदीपासून खूप उंचीवर उभारलेलं आहे. त्यामुळे या पुलावरून चालणं कुठल्याही व्यक्तीसाठी खूप खतरनाक अनुभव ठरू शकतं.

पाकिस्तानमधील गिलगिट-बाल्टिस्थान परिसरात असलेलं हुसैनी हँगिग ब्रिज जगातील खतरनाक पुलांपैकी एक म्हणून ओळखलं जातं. हे पुल दोरखंडांच्या सहाय्याने तयार करण्यात आलं आहे. अशा परिस्थितीत त्यावर चालण खूप आव्हानात्मक ठरतं. भीती वाटणाऱ्या लोकांसाठी हुसेनी ब्रिजवरून चालणं हा भयावह अनुभव ठरू शकतो.

उत्तर आयर्लंडमधील कॅरिक ए रेड रोप ब्रिजसुद्धा तेथील भयावह अनुभवासाठी प्रसिद्ध आहे. २० मीटर लांब असलेलं हे ब्रिज कड्यापासून ३० मीटर उंचीवर आहे. जगभरातील लाखो पर्यटक थ्रील अनुभवण्यासाठी या ब्रिजला भेट देत असतात.

या यादीमधील सहावा ब्रिज भारतात आहे. भारतातील मेघालय राज्यात असलेल्या लिव्हिंग रुटची गणना भारतालील खतरनाक पुलांमध्ये होते. हे पूल झाडांच्या मुळांपासून तयार करण्यात आलं आहे. हे पूल दिसायला सुंदर असलं तरी, त्यावरून चालणं खूप आव्हानात्मक ठरतं.