धक्कादायक! पाकिस्तानी विमानाचं चाक झालं गायब, लँडिंगनंतर समजला प्रकार, पाहा PHOTOS
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 19:10 IST2025-03-15T18:31:02+5:302025-03-15T19:10:08+5:30
Pakistan PIA flight wheel missing: जेव्हा एअरलाइन्सचे विमान लाहोरला लँड झाले, तेव्हा पायलटने तपासणी केल्यावर समोर आला प्रकार

Pakistan PIA flight wheel missing:
पाकिस्तान आणि अजब गोष्टी यांचं नातं काही नवीन नाही. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स म्हणजेच PIA ही पाकिस्तानची सरकारी विमान कंपनी आहे. पण या कंपनीची जेव्हा चर्चा होते, तेव्हा ती देशाचं नाव आणखी खराब करते.
आधी एअर होस्टेस परदेशातील हॉटेलमधून गायब झाली. मग तस्करीचा प्रकार घडला. एकदा त्यांनी अतिशय विचित्र जाहिरात बनवल्याने जागतिक स्तरावर त्यांचं हसं झालं. आता मात्र या कंपनीने प्रचंड धक्कादायक प्रताप केला आहे.
पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या (PIA) विमानातून चक्क एक चाकच गायब झाले. जेव्हा एअरलाइन्सचे देशांतर्गत विमान लाहोर विमानतळावर लँड झाले, तेव्हा त्याचे चाक गायब होते. त्यावरून आता मोठा गदारोळ माजला आहे.
सुरक्षेच्या चिंता वाढल्या... -
प्रवाशांना घेऊन आलेले विमान सुदैवाने सुरक्षितपणे लँड झाले आणि कोणालाही कोणतीही दुखापत झाली नाही. पण कराचीहून लाहोर विमानतळावर उतरल्यानंतर कॅप्टनने विमानाची तपासणी केल्यावर चाक गायब असल्याचे आढळून आले.
या घटनेमुळे पाकिस्तानच्या सरकारी मालकीच्या विमान कंपनीबद्दल सुरक्षेची चिंता निर्माण झाली आहे. डॉन न्यूजच्या वृत्तानुसार, PIA च्या फ्लाइट सेफ्टी आणि ब्युरो ऑफ एअर सेफ्टी तपास पथकांकडून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.
घडलेला प्रकार हा खळबळजनक आहे. तसेच केवळ दुर्लक्ष नव्हे तर प्रवाशांच्या जीवाशी हा एकप्रकारे खेळ असल्याचे सर्व नागरिकांचे मत आहे. त्यामुळेच या प्रकाराची कसून चौकशी सुरु आहे, पण प्राथमिक अहवाल अद्याप सादर झालेला नाही.
कराची विमानतळाजवळ सापडलं चाक... -
डॉन न्यूजने पीआयएच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, पीके-३०६ चे हरवलेले चाक यशस्वीरित्या शोधण्यात आले. कराचीच्या जिना आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दुर्गम पार्किंग बे असलेल्या इस्फहानी हँगरजवळ हे चाक सापडले.