'वो बेवफा नही है'... त्यानं गर्लफ्रेंडकडून अंगठी परत घेतली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 15:13 IST2019-04-12T15:10:13+5:302019-04-12T15:13:37+5:30

मुलांकडून मुलींना नेहमीच आकर्षित करण्याचा प्रयत्न होत असतो. लंडनमधील 27 वर्षीय जॉन एलियटने गर्लफ्रेंड एशेलला रोमँटीक अंदाजात प्रपोज करण्याच ठरवलं.

त्यासाठी जॉनने एशेलला भेट देण्यासाठी महागडी हिऱ्याची अंगठी विकत घेतली. या अंगठीची किंमत 7 लाख रुपये होती. मात्र, प्रपोज केल्यानंतर जॉनने अंगठी वापस घेतली.

जॉनने अंगठी परत घेतल्यामुळे एशेलही बुचकळ्यात पडली. पण, जॉनने केवळ 5 हजार रुपये देऊन ही अंगठी भाड्याने घेतली होती.

जॉनला वाटत असे की, एशेलसाठी अंगठी तिच्या पसंतीची असावी. तर, अंगठीशिवाय प्रपोज करणे जॉनला पसंत नव्हते. त्यामुळेच त्याने अंगठी भाड्याने घेतली.

जॉनने एशेलसाठी घेतलेली अंगठी ही 100 वर्षांपूर्वीची होती, जेनी पार्करच्या आजीच्या लग्नातील ही अंगठी आहे.