ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धकाळात चिनी पुरुषांना आवडताहेत युक्रेनीयन तरुणी, समोर आलं असं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 16:07 IST
1 / 6सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या भीषण युद्धाचे गंभीर परिणाम युक्रेनमधील जनजीवनावर होत आहेत. दरम्यान, या युद्धानंतर अजून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.2 / 6एका ऑनलाईन वेबसाईटवर युक्रेनमधील वधूंसाठी चिनी पुरुषांकडून वाढत्या मागणीचा कल दिसून येत आहे. डेटिंग सर्व्हिस मिलिश्काने सांगितले की, युद्ध सुरू होण्यापूर्वी सुमारे पाच इन्क्वायरी येत होत्या. मात्र आता ही संख्या दुप्पट झाली आहे. 3 / 6युक्रेनमध्ये महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेत अधिक आहे. स्टेपनेट्सने सांगितले की, चिनी पुरुष पूर्व युरोपातील तरुणींना अधिक पसंती देत आहेत. कारण त्या चिनी तरुणींप्रमाणे पैशाला अधिक महत्त्व देत नाहीत. 4 / 6मीलिश्का डेटिंग सर्व्हिस वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या काळात ७४८ युक्रेनी तरुणी चिनी पतीच्या शोधात आहेत. स्टेपनेट्सच्या दाव्यानुसार ७० चिनी तरुण आपल्यासाठी वधूचा शोध घेत आहेत. ८ ते ९ लोकांची जोडी बनली आहे. त्यांचे नंतर लग्न झाले आहे. 5 / 6 डेटिंग सर्व्हिसचे रशियन मालक पावेल स्टेपनेट्स यांनी सांगितले की, आता युक्रेनी तरुणींच्या मागणीबाबत खूप क्लायंट येत आहेत. त्यांना माहिती आहे की, युक्रेनी तरुणी सध्या दु:खी असतील आणि त्या चीन आपल्यासाठी अधिक सुरक्षित मानत असतील. 6 / 6अनेक वर्षांपासून युक्रेनी तरुणी ह्या चिनी तरुणांसोबत लग्न करत आल्या आहेत. मात्र युक्रेनवर रशियाने हल्ला केल्यानंतर ही संख्या अधिकच वाढली आहे. त्यामुळे चिनी तरुणांना वाटते की, त्या तरुणी चिनी पतीकडे चांगला पर्याय म्हणून पाहतील.