पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चीनमध्ये जंगी स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2018 16:03 IST2018-04-27T16:03:19+5:302018-04-27T16:03:19+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी रात्री उशीरा चीनच्या मध्यवर्ती भागांत असलेल्या वुहान शहरात पोहोचले.
यावेळी नरेंद्र मोदींचे जंगी स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमात चिनी कलाकांरांनी पारंपरिक नृत्याविष्कार सादर केले.
दोन दिवसीय दौऱ्यात 24 तासात सहा वेळा मोदी व जिनपिंग यांच्यात बैठका होणार आहे. मोदी आणि जिनपिंग यांची भेट अनेकार्थांनी महत्त्वाची आहे.चीन दौऱ्यात मोदी जिनपिंग यांच्याशी अनौपचारिक संवाद साधणार आहेत. यावेळी जागतिक, प्रादेशिक आणि द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा होणार आहे.
चिनी कलाकारांसमवेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चिनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग.