एक चूक आणि अणुबॉम्बच्या संहारानं संपेल मानवता, UN प्रमुखांचा इशारा; भारत-पाक बाबतही मोठं विधान!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 09:42 PM2022-08-02T21:42:15+5:302022-08-02T21:50:46+5:30

Nuclear Annihilation: संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटिनिओ गुटेरेस यांनी संपूर्ण जगाला एक सूचक इशारा दिला आहे. तसंच भारत आणि पाकिस्तानबाबतही एक महत्वाचं विधान केलं आहे. जगातील सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीच्या वातावरणाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. नेमकं काय म्हणाले संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटिनिओ गुटेरेस जाणून घेऊयात...

Nuclear Annihilation: संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटिनिओ गुटेरेस यांनी संपूर्ण जगाला एक सूचक इशारा दिला आहे. फक्त एक चूक जगाला अणुहल्ल्याच्या विनाशाकडे घेऊन जाऊ शकते. संपूर्ण जगात सर्व देशांकडून सातत्यानं अण्वस्त्रांची मागणी आणि क्षमता वाढवली जात आहे. हे तात्काळ रोखण्याची गरज आहे. अण्वस्त्रांची निर्मिती करणाऱ्या आणि बाळगणाऱ्या देशांनी एक पाऊल आता मागे हटण्याची गरज आहे, असं अँटिनिओ म्हणाले आहेत.

"आजवर आपण नशीबवान राहिलो आहोत. पण नशीबवान असणं हे कोणत्याही रणनीतीचा हिस्सा असू शकत नाही. जगात वाढत असलेल्या तणावामुळे अणुहल्ल्याची शक्यता वाढत आहे. सध्या मानवाचा एक गैरसमज आणि चुकीचं कॅल्क्युलेशन संपूर्ण जगासाठी विनाशकारी ठरू शकतं", असं संयुक्त राष्ट्रांचे सचिव अँटिनिओ यांनी 'ट्रीटी ऑन द नॉन-प्रोलिफिरेशन ऑफ न्यूक्लिअर वेपंस'च्या बैठकीत म्हटलं आहे.

संभाव्य धोक्याबाबत तुम्ही एक पाऊल मागे आला आहात की नाही यावर भविष्यातील पीढीचा विश्वास बसणं सध्या गरजेचं आहे. १९७० नंतर आतापर्यंत अनेक देशांनी अणु सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. पण आतापर्यंत इस्रायल, उत्तर कोरिया, भारत आणि पाकिस्ताननं यावर स्वाक्षरी केलेली नाही. या सर्वांकडे अण्वस्त्र आहेत. १९४५ साली जपानवर अणुहल्ला झाल्यानंतर आतापर्यंत तरी अण्वस्त्र हल्ला झालेला नाही. यासाठी आपण खरंच आपल्या नशीबाचे आभार मानले पाहिजेत. ना की संघर्ष रोखण्यासाठीच्या केलेल्या प्रयत्नांचे.

संयुक्त राष्ट्राचे प्रमुखांनी सांगितलं की जगासमोर सध्या खूप आव्हानं आहेत. शीतयुद्धानं टेन्शन वाढवलं आहे आणि अण्वस्त्र हल्ल्यामुळे होणाऱ्या विनाशाची दाट शक्यता आहे. कारण शीतयुद्धामुळे जगातील अनेक देशांमधील वातावरण सध्या तापलेलं आहे. युद्ध होत आहेत. संघर्ष होत आहेत. म्हणजेच अण्वस्त्र हल्ल्याची शक्यता टाळता येत नाही, असंही ते म्हणाले.

जलवायू संकट, विविध घटना, वाद, मानवाधिकारांचं उल्लंघन, कोविडमुळे वैयक्तिक आणि आर्थिक दिवाळखोरी यामुळे संपूर्ण जगात तणावाचं वातावरण आहे. हा आपल्या जीवानातील सर्वात धोकादायक काळ सुरू आहे. सध्या जे वातावरण आहे असं वातावरण आपण शीतयुद्धानंतर कधीच पाहिलेलं नाही. तेही अशा देशांमध्ये ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात अण्वस्त्र आहेत, असंही अँटिनिओ म्हणाले.

जगानं हिरोशिमा आणि नागासाकीवर झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्याची घटना कधीच विसरू नये. आपण सर्वांनी त्यातून धडा घेतला पाहिजे. सध्या अशी स्पर्धा सर्व देशांमध्ये सुरू आहे आणि मैत्री संपत आहे. विश्वास संपत चालला आहे. संवाद हरपत आहे. सर्व देश कोट्यावधी रुपये प्रलयकारी शस्त्र निर्मितीवर खर्च करत आहेत, असं अँटिनिओ यांनी म्हटलं आहे.