रशियाचं नवं 'ब्रह्मास्त्र' S-500, आकाशात उपग्रहांचाही करेल खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 04:49 PM2020-07-16T16:49:48+5:302020-07-16T17:09:40+5:30

अमेरिका आणि नाटोच्या इतर देशांशी तणाव वाढत असतानाच रशीया लवकरच एक नवे 'ब्रह्मास्‍त्र' तैनात करण्याची शक्यता आहे. रशियाचे हे ब्रम्हास्त्र एवढे घात आहे, की आकाशातून येणाऱ्या हायपरसोनिक क्षेपणास्त्रांचाही ते सहजपणे खात्‍मा करू शकते. रशियाच्या या ब्रह्मास्‍त्राचे नाव आहे, S-500. ही अत्‍याधुनिक मिसाइल डिफेन्स सिस्‍टिम आपल्या पूर्वीच्या S-400 चे स्थान घेईल.

अवकाशातून होणाऱ्या हल्ल्यांनाही उद्धवस्त करेल S-500 - S-500 प्रोमेथियस एअर डिफेन्स सिस्टम जमिनीवरून हवेत मारा करण्यास सक्षम आहे. हे रशियाचे एक असे संरक्षण कवच आहे, जे हायपरसोनिक क्षेपणास्त्रांपासून ड्रोन विमानांनाही क्षणात उद्ध्वस्त करू शकते.

एस-500 डिफेन्स मिसाइल सिस्टिमची रेंज 400 ते 600 किलो मीटर एवढी आहे. या डिफेन्स सिस्‍टिमचे मुख्‍य अभियंता पावेल सोजिनोव यांनी घोषणा केली, की एस-500 जमिनीपासून शेकडो किलोमिटर उंचावरील लक्ष्यही सहजपणे नष्ट करू शकते.

ही मिसाइल डिफेन्स सिस्टिम 16 हजार मैल प्रतितास वेगाने किलर मिसाइल्सना लक्ष्‍याच्या दिशेने पाठवते. हा वेग आवाजाच्या वेगापेक्षा फार अधिक आहे.

S-500 ला जगात तोड नाही - रशियाच्या एअरोस्‍पेस फोर्सेसचे कमांडर सर्गेई सुरोविकिन यांनी सांगितले, की एस-500 तंत्रज्ञानाची खासीयत याला पहिल्या पिढीचे स्‍पेस डिफेन्स नेटवर्कचे शस्त्र बनवते. अशापद्धतीचे शस्त्र जगात दुसरे नाही.

एस-500 हे सर्व प्रकारचे बॅलिस्टिक मिसाइल्स आणि आकाशातूनही सोडले जाऊ शकते, अशा हायपरसोनिक शस्त्रांच्याही सहजपणे चिंधाड्या उडवू शकते. ही डिफेन्स सिस्टिम एकाच वेळी 10 लक्ष्‍य भेदू शकते.

एवढेच नाही, तर अंतराळाच्या खालच्या कक्षेत फिरणाऱ्या उपग्रहांनाही एस-500 नष्‍ट करू शकते. या सिस्टिमची निर्मिती अलमाज अँटी एअर डिफेन्स कर्सनने केली आहे.

2019 मध्ये यशस्वी परीक्षण - एस-500 चे मुख्‍य काम आपल्या जवळ येणाऱ्या मध्‍यम पल्ल्याच्या आणि अंतरखंडीय मिसाइल्सचा सामना करणे आहे. या मिसाइल डिफेन्स सिस्‍टिमचे 2019 मध्ये यशस्वी परीक्षण करण्यात आले आहे.

यूनानी देवतेच्या नावावरून ठेवण्यात आले आहे, S-500 प्रोमेथियस नाव - असे मानले जाते, की रशिया या सिस्टिमला 2021 पर्यंत रशियन सैन्यात दाखल करेल. यूनानी देवता प्रोमेथियसच्या नावाने या सिस्टिमचे नाव एस-500 प्रोमेथियस असे ठेवण्यात आले आहे. एस-500 डिफेन्स सिस्टिमला 55R6M Triumfator-M नावानेही ओळखले जाते. पहिल्या वर्षी 2014 मध्ये हिचे उत्पादन करण्यात येणार होते, मात्र, आता हा कालावधी वाढवून 2021 करण्यात आला आहे.

एस-400 पेक्षा किती वेगळे? - एस-500 आपल्या पूर्वीच्या एस-400 च्या तुलनेत अनेक गोष्टींनी भिन्न आहे. एस-500 ची रेंज एस-400 पेक्षा 400 किमी अधिक आहे. एस-500 चे रडारदेखील एस-400 च्या तुलनेत अधिक शक्तिशाली आहे.

एस-500 हायपरसोनिक मिसाइल्सदेखील ट्रॅक करून ते नष्‍ट करू शकते. एवढेच नाही, तर एखाद्या देशाने अवकाशातून हायपरसोनिक एअरक्राफ्ट अथवा ड्रोन सोडले, तर ते नष्ट करण्याची क्षमताही एस-500 मध्ये आहे.

यामुळेच, रशिया अपल्या या मिसाइल डिफेन्स सिस्टिमसंदर्भाततील माहिती अत्यंत गोपनीय ठेवत आहे. एस-500 मिसाइल डिफेन्स सिस्टिममध्ये 77N6 आणि 77N6-N1 हे घातक मिसाइल्स लावण्यात आले आहेत.

एफ-35 उद्धवस्त करण्यासही सक्षम, सतावतेय भारताची भीती - रशियन माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ही डिफेन्स सिस्टिम अमेरिकेच्या अत्‍यधुनिक एफ-35 ला भेदण्यासही सक्षम आहे. मुख्‍य अभियंता पावेल सोजिनोव म्हणतात, एस-500 म्हणजे अमेरिकन प्रतिष्‍ठेला मोठा धक्का आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाने या म‍िसाइल डिफेन्स सिस्टिमचे काम पूर्ण केले आहे. आता रशिया S-400 डिफेन्स सिस्टिम भारतासह अनेक देशांना निर्यात करत आहे. यामुळेच त्याने एस-500 ची घोषणा केलेली नाही. रशियाला वाटते, की त्याचे ग्राहक भारत आणि तुर्की एस-500 ची मागणी करू शकतात. किंबहुना, त्यांचे डिफेन्स सिस्टिम जुने झाले असेही त्यांना वाटू शकते.