बिल गेट्स महिला कर्मचाऱ्यांना करायचे फ्लर्ट, पाठवायचे मेल; अधिकाऱ्यांनी दिला होता कारवाईचा इशारा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 04:14 PM2021-10-19T16:14:38+5:302021-10-19T16:23:06+5:30

संबंधित वृत्तात म्हणण्यात आले आहे, की बिल गेट्स यांनी ईमेल संदर्भातील चर्चा नाकारलेली नाही. तसेच, मायक्रोसॉफ्ट बोर्डाच्या ज्या सदस्यांना यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे, त्यांनी पुढील कारवाई केली नाही. कारण...

मायक्रोसॉफ्टच्या (Microsoft) अधिकाऱ्यांनी 2008 मध्ये बिल गेट्स (Bill Gates) यांना, एका महिला कर्मचाऱ्याला फ्लर्ट करणारे ईमेल पाठवणे थांबवण्याचा इशारा दिला होता. यावर, आता आपण असे करणार नाही, असे बिल गेट्स यांनी म्हटले होते. खुद्द कंपनीनेच यासंदर्भात सोमवारी खुलासा केला आहे.

वॉल स्ट्रीट जर्नलने अपल्या एका वृत्तात म्हटले आहे, की तत्कालीन मायक्रोसॉफ्ट जनरल काउंसिल, आता तिचे अध्यक्ष आणि व्हाइस चेअर ब्रॅड स्मिथ (Brad Smith) आणि एका इतर कर्मचाऱ्याने कंपनीच्या मीड लेव्हलच्या कर्मचारी महिलेला अयोग्य मेल केल्यानंतर, गेट्स यांची भेट घेतली होती.

संबंधित वृत्तात म्हणण्यात आले आहे, की बिल गेट्स यांनी ईमेल संदर्भातील चर्चा नाकारलेली नाही. तसेच, मायक्रोसॉफ्ट बोर्डाच्या ज्या सदस्यांना यासंदर्भात माहिती देण्यात आली, त्यांनी पुढील कारवाई केली नाही. कारण, गेट्स आणि कर्मचारी महिला यांच्यात कुठल्याही प्रकारचा शारीरीक संबंध झालेला नाही.

मायक्रोसॉफ्टने यासंदर्भात कसल्याही प्रकारचे भाष्य करण्यास नकार दिला आहे. पण त्यांनी, या वृत्ताची पुष्टी केली आहे. तर, कंपनीकडून जेव्हा स्मिथ यांना प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी काहीही उत्तर दिले नाही. यासंदर्भात, गेट्स यांच्या खासगी कार्यालयाने एक लेखी निवेदनात, ‘हे दावे खोटे आहे. ही केवळ सूत्रांची अफवा आहे, ज्यांना काहीही माहिती नाही,' असे म्हटले आहे.

...म्हणून गेट्स यांना माइक्रोसॉफ्टच्या बोर्डावरून पाय उतार व्हावे लागले होते - साधारणपणे 2008 मध्येही एक अशा प्रकारची तक्रार करण्यात आली होती. यामुळेच टेक कंपनीने 2019 मध्ये एक लॉ फर्म नियुक्त केली. या फर्मने एका महिला इंजिनियरच्या एका पत्राची चौकशी सुरू केली. या पत्रात, गेट्ससोबत तिचे अने वर्षं शारिरीक संबंध होते, असे म्हणण्यात आले होते. या चौकशीमुळे गेट्स यांना गेल्या वर्षी माइक्रोसॉफ्टच्या बोर्डावरून पाय उतार व्हावे लागले होते.

बिल गेट्स आणि मेलिंडा फ्रेंच विभक्त झाल्यानंतर समोर आले प्रकरण - मात्र, ये प्रकरण जोवर बिल गेट्स आणि मेलिंडा फ्रेंच (Melinda French Gates) एकत्र होते, तोवर सार्वजनिकरित्या समोर आले नव्हते. मे महिन्यात या दोघांनीही 27 वर्षं एकत्र राहिल्यानंतर विभक्त होण्याची घोषणा केली होती.

2000 नंतर बिल गेट्स यांनी कंपनीतील लक्ष कमी केले - बिल गेट्स आणि मेलिंडा फ्रेंच यांचा ऑगस्टमध्ये घटस्फोट झाला. तथापि, हे दोघेही अजूनही संयुक्तपणे 'बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशन' चालवत आहेत. गेट्स 2000 पर्यंत कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहिले आहेत. परंतु त्यानंतर त्यांनी हळूहळू कंपनीतील त्यांचा सहभाग कमी केला. गेट्स 2008 मध्ये मायक्रोसॉफ्टमधील आपल्या डे टू डे रोलमधून बाहेर पडले आणि 2014 पर्यंत ते बोर्डाचे चेअरमन होते.

मायक्रोसॉफ्टचे प्रवक्ता फ्रँक शॉ यांनी जर्नलशी बोलताना सांगितले, की कंपनीच्या अधिकाऱ्यांनी 2008 मध्ये दिलेला इशारा हा, गेट्स पूर्णवेळ कर्मचारी म्हणून सेवानिवृत्त होण्याच्या काही दिवस आधीच देण्यात आला होता.