एका चुकीमुळे सडू लागला होता या व्यक्तीचा प्रायव्हेट पार्ट, डॉक्टरांनी दिला इशारा....
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 19:12 IST2021-07-15T19:02:31+5:302021-07-15T19:12:43+5:30
जेव्हा डॉक्टरांनी या व्यक्तीला विचारलं की, अखेर त्यांनी असं का केलं? तर ही व्यक्ती व्यवस्थित उत्तर देऊ शकत नव्हती आणि बरीच कन्फ्यूज होती. डॉक्टरांना तपासणीत आढळून आलं की, या व्यक्तीला डिमेंशिया आजार आहे.

या व्यक्तीच्या या भयानक केसबाबत सर्वातआधी एका मेडिकल जर्नलमध्ये छापून आलं होतं. या व्यक्तीला आधी डायबिटीसशी संबंधित समस्येमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. या व्यक्तीच्या पत्नीने डॉक्टरांना असंही सांगितलं की, त्यांचा पतीने गेल्या दोन-तीन दिवसांपासून प्रायव्हेट पार्टला रबर बॅंड बांधून ठेवत आहे.

डॉक्टरांना आढळून आलं की, या व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टवर फार सूज आली आहे आणि काही भागात रंगही बदलणं सुरू झालं आहे. डॉक्टरांनुसार, या व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टची स्कीन खराब होत होती आणि प्रायव्हेट पार्ट सडणंही सुरू झालं होतं.

डुबलिनमधील बेकन हॉस्पिटलचे ड़ॉक्टर फारडोड ओ केली हे यूरोलॉजिकल सर्जन म्हणून काम करतात. त्यांनी मेल ऑनलाइनसोबत बोलताना सांगितलं की, प्रायव्हेट अशाप्रकारच्या प्रेशरला काही तास सहन करू शकतो. पण काही तासांनी दबाव इतका वाढू शकतो की, याने धमण्यां कम्प्रेस होऊ शकतात.

ते म्हणाले की, 'याचा अर्थ हा होईल की, त्या भागात ब्लड सप्लाय होत नसेल म्हणजे ऑक्सीजनचा सप्लायही कमीच होईल. याने शरीराचा कोणताही अवयव मरू लागतो आणि प्रायव्हेट पार्ट वेगळा होऊनही पडू शकतो. मात्र, मी कधी अशा केसबाबत ऐकलं नाही'.

जेव्हा डॉक्टरांनी या व्यक्तीला विचारलं की, अखेर त्यांनी असं का केलं? तर ही व्यक्ती व्यवस्थित उत्तर देऊ शकत नव्हती आणि बरीच कन्फ्यूज होती. डॉक्टरांना तपासणीत आढळून आलं की, या व्यक्तीला डिमेंशिया आजार आहे.

या व्यक्तीची शिकागोमध्ये इमरजन्सी सर्जरी करण्यात आली. पुढील पाच दिवसात ही व्यक्ती रिकव्हर होत होती. शिकागो मेडिकल सेंटरच्या डॉक्टरांनी या व्यक्तीला सांगितलं होतं की, दोन आठवड्यांनी चेकअपसाठी पुन्हा भेटायचं आहे. पण ही व्यक्ती सर्जरीनंतर हॉस्पिटलमध्ये गेलीच नाही.

यूरोलॉजी केस रिपोर्टमध्ये प्रकाशित या रिपोर्टच्या लेखकांचं म्हणणं होतं की, या व्यक्तीला डायबिटीसचा आजार होता. त्यामुळे रबर बॅंडचा प्रभाव आणखी जास्त खराब झाला होता.

















