सगळं संपणार? पृथ्वीवर फक्त बॅक्टेरीयांचं असेल साम्राज्य; नष्ट होतील मनुष्य, झाडे अन् सर्व जीव - रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2021 01:20 PM2021-03-05T13:20:19+5:302021-03-05T13:32:58+5:30

झाडे नष्ट झालीत तर ऑक्सीजनचं उत्पादन कमी होईल. क्रिस रीनहार्ड सांगतात की, ही कमतरता फारच भयावह असेल. ऑक्सीजनचं प्रमाण वर्तमानापेक्षा लाखो पटीने आणखी खाली येईल.

भविष्यात पृथ्वीवर ऑक्सीजनचं प्रमाण खूप कमी होईल. त्यामुळे पृथ्वीवरील अनेक जीव नष्ट होतील. हा खुलासा केला आहे जपान आणि अमेरिकेतील काही वैज्ञानिकांनी. वैज्ञानिकांनुसार, पृथ्वीवर १०० कोटी वर्षानंतर ऑक्सीजनचं प्रमाण फारच कमी होईल. ज्यामुळे एअरोबिक जीव आणि फोटोसिथेंटिक जीवांचं जीवन धोक्यात येईल. ते नष्ट होण्याची शक्यता जास्त होईल. (All Image Credit : Getty)

पृथ्वीच्या वायुमंडलात ऑक्सीजनचा भाग हा साधारण २१ टक्के आहे. मनुष्यांसारखे कठीण संरचना असलेल्या जीवांसाठी ऑक्सीजन असणं फार गरजेचं आहे. पण पृथ्वीच्या सुरूवातीला ऑक्सीजनचं प्रमाणही कमीच होतं. हीच स्थिती भविष्यात १०० कोटी वर्षानंतर येईल.

जपानच्या टोहो यूनिव्हर्सिटीतील वैज्ञानिक काजुमी ओजाकी आणि अटलांटाच्या जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे क्रिस रीनहार्ड यांनी पृथ्वीचं क्लायमॅट, बायोलॉजिकल आणि जिओलॉजिकल सिस्टमचं एक मॉडल तयार केलं. यातून ते भविष्यात पृथ्वीवर होणाऱ्या वायुमंडळाच्या बदलांची गणना करत आहेत.

दोन्ही वैज्ञानिकांनुसार, पुढील १०० कोटी वर्षापर्यंत पृथ्वीचा ऑक्सीजनचा स्तर अशाप्रकारेच कायम राहील. पण त्यानंतर ऑक्सीजनच्या प्रमाणात भयावह कमतरता येईल. याचं मुख्य कारण म्हणजे सूर्याचं वय वाढणं. जसजसं सूर्यांच वय वाढत जाणार तो अधिक जास्त गरम होत जाणार.

सूर्य जास्त गरम होण्याचा प्रभाव पृथ्वीवर असलेल्या कार्बन डायऑक्साइडवर पडेल. CO2 कमी होऊ लागेल. याने सूर्याची उष्णता झेलण्याची पृथ्वीची क्षमता कमी होईल. यानंतर पृथ्वीचं वायूमंडळ तुटू लागेल. CO2 कमी झालं तर फोटोसिंथेसायसिंग जीव जसे की, झाडे-झुडपं जगू शकणार नाहीत.

झाडे नष्ट झालीत तर ऑक्सीजनचं उत्पादन कमी होईल. क्रिस रीनहार्ड सांगतात की, ही कमतरता फारच भयावह असेल. ऑक्सीजनचं प्रमाण वर्तमानापेक्षा लाखो पटीने आणखी खाली येईल.

इतकेच नाही तर काजुमी ओजाकी आणि क्रिस रीनहार्ड यांनी अंदाज लावला की, त्या वेळापर्यंत पृथ्वीच्या वायुमंडळात मीथेन गॅसचं प्रमाण १० हजार पटीने जास्त वाढेल. जसाही हा बदल सुरू होईल हे फार वेगाने होईल. १०० कोटी वर्षानंतर पुढील १० हजार वर्षात पृथ्वीवरील ऑक्सीजनचं प्रमाण पूर्ण संपेल.

काजुमी ओजाकी म्हणाले की, पृथ्वीचं बायोस्फेअर अचानक होत असलेल्या या पर्यावरणीय बदलाला सहन करू शकणार नाही. यानंतर पृथ्वीवर केवळ सूक्ष्म जीवच जिवंत राहतील. सध्या जे एनएरोबिक आणि प्राचीन बॅक्टेरिया लपलेले आहेत ते पृथ्वीवर राज्य करू लागतील. जमीन आणि समुद्रातील जीव नष्ट होतील.

पृथ्वीवर ओझोन लेअर जो ऑक्सीजनपासून तयार झालाय तो नष्ट होईल. यामुळे जमीन आणि समुद्रावर जास्त तीव्र अल्ट्रावॉयलेट किरणे पडतील. पृथ्वीला हे सहन होणार नाही. हा रिसर्च NASA च्या प्लॅनेट हॅबिटॅबिलिटी प्रोजेक्टचा भाग आहे.

जॉन हॉपकिंस यूनिव्हर्सिटीच्या नॅटली एलेन सांगतात की, पृथ्वीवर ऑक्सीजन अनेक रूपात उपलब्ध आहे. हे तेव्हापासून पृथ्वीवर आहे जेव्हापासून जीवनाची सुरूवात झाली. पण नव्या रिसर्चनुसार, पृथ्वीवरील ऑक्सीजनचा स्तर कमी होऊ शकतो. कारण यामागे काही पर्यावरणीय, अंतराळासंबंधी कारणे आहेत. पृथ्वी नेहमी राहण्यालायक ग्रह राहणार नाही.