ही आहे हुकूमशहा Kim Jong Un ची मुलगी, उत्तराधिकारी बनण्याची सुरू झाली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 11:09 AM2023-02-10T11:09:23+5:302023-02-10T11:14:31+5:30

Kim Jong Un daughter Kim Ju Ae : उत्तरी कोरियाच्या हुकूमशहा सलामीसाठी आपल्या जागेवर आला तेव्हा त्याच्यासोबत काळ्या ड्रेसमध्ये एक मुलगी होती.

Kim Ju Ae: उत्तर कोरियामध्ये एक महत्वाची घटना बघायला मिळाली. बुधवारी उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन परेडच्या सलामी दरम्यान एकटा दिसला नाही. यावेळी त्याच्यासोबत त्याची मुलगीही दिसली. तेव्हापासून किम जोंग उनच्या उत्तराधिकारीबाबत चर्चा सुरू झाली आहे.

उत्तरी कोरियाच्या हुकूमशहा सलामीसाठी आपल्या जागेवर आला तेव्हा त्याच्यासोबत काळ्या ड्रेसमध्ये एक मुलगी होती. असं मानलं जातं की, असं मानलं जातं की, ती किम जोंग उनचं दुसरं अपत्य आहे. तिचं नाव किम जू-एई आहे. तर तिचं वय 10 वर्षे आहे.

बुधवारी रात्री उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांगमध्ये मॉन्स्टर मिसाइल बघण्यात आले. यावेळी किम जोंग उन परेडची सलामी घेत होता. त्यावेळी ही त्याची मुलगी त्याच्यासोबत दिसून आली. तेव्हा सगळ्यांची नजर तिच्यावर होती. ती पाचव्यांदा सार्वजनिक कार्याकमात उपस्थित राहिली.

तेच मंगळवारी रात्री परेडआधी त्याची मुलगी उत्तर कोरियातील मोठ्या सैन्य अधिकाऱ्यांसोबत जेवण करतानाही दिसली. यावेळी तिने एक पांढरं शर्ट आणि काळा बटन-अप स्कर्ट सूट घालता होता.

फार कमी काळात त्याची मुलगी अनेक महत्वाच्या इव्हेंटमध्ये दिसली. ज्यामुळे अशी शक्यता वर्तवली जात आहे की, तिला उत्तर कोरियाची भावी नेता म्हणून निवडलं गेलं असेल.

पहिल्यांदा किम जोंग उनच्या मुलीला गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये एका अंतरमहाद्वीपीय बॅलिस्टिक मिसाइल (आईसीबीएम) च्या लॉन्च दरम्यान बघण्यात आलं होतं. तेव्हापासूनच ती चर्चेत आहे.