शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

झूम अ‍ॅपवर मुलांचा क्लास चालू असताना अचानक सुरू झालं पॉर्न अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 6:23 PM

1 / 8
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू आहे. अशा परिस्थितीत मुलांची शाळाही बंद आहे. मात्र काही शाळा ऑनलाइनद्वारे मुलांचे क्लास घेत आहेत.
2 / 8
सध्या ऑनलाइन मीटिंग्ज आणि क्लासेससाठी झूम अ‍ॅपचा खूप वापर केला जात आहे. परंतु या झूम अ‍ॅपवर मुलांचा क्लास सुरू असताना अचानक अश्लील व्हिडिओ प्ले झाला. त्यामुळे 60 मुले घाबरली, असे सांगण्यात येत आहे.
3 / 8
बीबीसीच्या म्हणण्यानुसार ही घटना लंडन येथील आहे. मुले झूम अ‍ॅपवर ऑनलाइन शिकत असताना हॅकरने हॅकिंगच्या माध्यमातून अ‍ॅपवर अश्लील व्हिडिओ प्ले केला. त्यावेळी मुले आणि काही तरुण झूम अ‍ॅपद्वारे फिटनेसचे क्लास घेत होते.
4 / 8
स्थानिक पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हॅकरची अद्याप ओळख पटू शकली नाही. परंतु हॅकरने झूम कॉलचा डेटा ऑनलाइन पोर्टलवरून घेतला होता, ज्याठिकाणी तो प्रकाशित केला होता.
5 / 8
दुसरीकडे, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले की,'आम्ही प्लायमाउथ सेफगार्डिंग चिल्ड्रन पार्टनरशिपसोबत मिळून काम करत आहोत.'
6 / 8
याचबरोबर, तुम्हाला याचा परिणाम झाला तर तुम्ही पुढे येऊन तुम्ही कोण आहात ते आम्हाला सांगावे म्हणजे आम्ही आपल्याला आवश्यक सल्ला आणि मदत करण्याचा प्रयत्न करू, अशी विनंती या अधिकाऱ्याने केली आहे.
7 / 8
याशिवाय, पोलीस अधिकाऱ्यांनी लोकांना त्यांच्या उपकरणांची सुरक्षा सेटिंग्ज बदलण्याचे आवाहन केले.
8 / 8
मुलांच्या चॅरिटीसाठी काम करणाऱ्या एनएसपीसीसी या संस्थेने माध्यमांना सांगितले की, झूम अॅपवर बाल लैंगिक अत्याचाराची अनेक छायाचित्रे दाखविली गेली, जी चिंतेची बाब आहे.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcorona virusकोरोना वायरस बातम्या