शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

John McAfee : जॉन मॅकॅफींनी कॉलगर्लला एका रात्रीसाठी हायर केलं अन् ...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 3:03 PM

1 / 11
जगातील प्रसिद्ध संगणक अँटीव्हायरस कंपनी McAfee चे संस्थापक जॉन मॅकॅफी यांनी तुरुंगात आत्महत्या केली आहे. कर चुकवणे आणि फसवणूकीच्या आरोपाखाली त्यांना तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. जॉन मॅकॅफी आणि त्यांची पत्नी त्यांच्या लक्झरी आणि ग्लॅमरस लाइफ स्टाइलसाठी देखील परिचित होते. दरम्यान, जॉन मॅकॅफी यांनी कॉलगर्लसोबत लग्न केले होते. हे त्याचे तिसरे लग्न होते.
2 / 11
71 वर्षीय जॉन मॅकॅफी हे आपल्या 34 वर्षांच्या पत्नी जेनिस डायसन यांना पहिल्यांदा भेटले, त्यावेळी कॉलगर्ल म्हणून त्यांना एक रात्र एकत्र घालवण्यासाठी बोलविले होते. याबाबतचा खुलासा त्यांनी एका कार्यक्रमावेळी केला होता.
3 / 11
जॉन मॅकॅफी यांनी जेनिस डायसन यांना ग्वाटेमालाहून अमेरिकेत स्थलांतरित केल्यानंतर दुसर्‍या दिवशी मियामी बीच कॅफेमध्ये एक रात्र आणि एक दिवस एकत्र काम करण्यासाठी नियुक्त केले. यानंतर जॉन मॅकॅफी यांनी 2013 साली जेनिस डायसन यांच्यासोबत लग्न केले, त्यानंतर जेनिस डायसन यांनीही आपले आडनाव मॅकॅफीवर असे ठेवले. यावर, त्याची पत्नी जेनिस डायसन म्हणाल्या की, हे एखाद्या जादूसारखे होते.
4 / 11
मॅकॅफी अँटीव्हायरस सॉफ्टवेअरची निर्माता जॉन मॅकॅफी यांनी जेनिस यांना हिंसक दलाल आणि लैंगिक तस्करीपासून वाचवले होते, जेणेकरुन त्या त्यांच्यापासून दूर झालेल्या मुलाशी पुन्हा संपर्क साधू शकतील आणि नव्याने सुरुवात करू शकतील. याचा खुलासा त्यांच्या पत्नीनेच केला होता.
5 / 11
एका कार्यक्रमात जेनिस यांनी सांगितले की, जॉन मॅकॅफी यांनी माझ्यामध्ये माणुसकी पाहिली आणि दुसर्‍या संधीसाठी मी पात्र आहे, असे त्यांनी म्हटले. या कार्यक्रमादरम्यान जॉन मॅकॅफी यांनी तो क्षण आठवला आणि म्हणाले, 'मी जेनिसमध्ये माझ्या आयुष्यात जे शोधत होतो तेच पाहिलं.'
6 / 11
पीएचडीचा विद्यार्थी होते, त्यावेळी जॉन मॅकॅफी यांनी महाविद्यालयीन विद्यार्थिनीशी पहिल्यांदा लग्न केले. मात्र, या पहिल्या पत्नीने जॉन मॅकॅफी यांना त्यांच्या नशेच्या सवयीमुळे 1980 मध्ये सोडले होते.
7 / 11
1983 मध्ये जॉन मॅकॅफी एकटेच राहत होते, ड्रगच्या व्यसनामुळे त्यांनी आपले घर विकले होते. त्यावेळी त्यांनी आत्महत्येचा विचार केला होता, असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.
8 / 11
1986 मध्ये जॉन मॅकॅफी यांनी एक बातमी वाचली की, एक पाकिस्तानी कॉम्प्यूटर व्हायरस अमेरिकन कॉम्प्युटर्सचे नुकसान करत आहे. यानंतर, त्यांनी कॅलिफोर्नियाच्या सांता क्लारा येथील आपल्या घरातून McAfee Associates ची सुरूवात केली.
9 / 11
त्यांनी एक अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर लॉन्च केले आणि ते लोकांना विनामूल्य उपलब्ध करुन देण्यासाठी मेसेजिंग बोर्डवर याची जाहिरात केली. त्याची ही आयडिया चालली आणि ते अमेरिकेच्या प्रभावी लोकांमध्ये सामील झाले.
10 / 11
त्यानंतर जॉन मॅकॅफी सिलिकॉन व्हॅलीमधील जुडी नावाच्या आणखी एका महिलेशी दुसरे लग्न केले. 2000 मध्ये एक योग स्टुडिओ ओपन केला आणि बरीच वर्षे चांगले आणि आर्थिक घोटाळेमुक्त असे जीवन जगले. 2009 मध्ये अमेरिकेतील आर्थिक मंदीचा त्यांच्यावर वाईट परिणाम झाला आणि त्यांना आपली बरीच मालमत्ता विकावी लागली. याचवेळी त्यांचा दुसर्‍या पत्नीपासूनही घटस्फोट झाला.
11 / 11
दरम्यान, यानंतर 2010 मध्ये त्यांनी अनेक गर्लफ्रेंड बनवल्या आणि बर्‍याच मुलींसोबत नाते ठेवले. यानंतर 2013 मध्ये, त्यांनी कॉल गर्ल जेनिस डायसनसोबत लग्न केले.
टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयtechnologyतंत्रज्ञानJara hatkeजरा हटके