शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 14:42 IST

1 / 6
इस्राइलने ऑपरेशन राजझिंग लायनच्या माध्यमातून इराणमधील अणुकेंद्रांवर हल्ला केला होता. तसेच या कारवाईदरम्यान इस्राइलने इराणचे आघाडीचे शास्त्रज्ञ आणि लष्करी अधिकाऱ्यांनाही टिपले होते. त्यामुळे खवळलेल्या इराणने इस्राइलवर प्रत्युत्तरदाखल कारवाई केली आहे.
2 / 6
इराणने केलेल्या हल्ल्यांमध्ये इस्राइलमधील प्रमुख शहर असलेल्या तेल अवीवमध्ये प्रचंड नुकसान झालं आहे. अनेक घरं उद्ध्वस्त झाली आहे. तर काही घरं पूर्णपणे जमिनदोस्त झाली आहेत. इराणने इस्राइलवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या माध्यमातून हा हल्ला केला आहे.
3 / 6
इस्राइलने इराणमधील अणुकेंद्र आणि लष्करी तळांना लक्ष्य केल्यानंतर प्रत्युत्तरदाखल केलेल्या कारवाईत इराणने इस्राइलवर हा जबरदस्त हल्ला केला आहे. या हल्ल्याची भीषणता समोर आलेल्या हल्ल्यामधून दिसून येत आहे.
4 / 6
हा फोटो तेल अवीवच्या दक्षिणेतील रिशोन लिजियन येथील आहे. येथे इराणी क्षेपणास्त्रांमुळे जबरदस्त हानी झाली आहे.
5 / 6
इराणने केलेल्या या हल्ल्यात तेल अवीवमधील अनेक इमारतींचं नुकसान झालं आहे. सोबतच अनेक जण जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचाव मोहीम सुरू आहे.
6 / 6
इराणकडून इस्राइलवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागण्यात आलं आहे. हल्लामध्ये मध्य इस्राइलमधील अनेक घरांचं नुकसान झालं आहे. रात्री झालेल्या या हल्ल्याची दाहकता सकाळी समोर आलेल्या फोटोमधून समोर आली आहे.
टॅग्स :Israelइस्रायलIranइराणwarयुद्ध