Israel Hamas War : भीषण, भयंकर, भयावह! इस्रायल-हमास युद्धाचे 100 दिवस; गाझा उद्ध्वस्त, 25 हजार मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 03:01 PM2024-01-14T15:01:26+5:302024-01-14T15:17:03+5:30

Israel Hamas War : इस्रायलने गाझा पट्टीतील हमासच्या ठिकाणांवर शेकडो हवाई हल्ले केले आहेत.

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला आता 100 दिवस झाले आहेत. मात्र असं असून देखील युद्धाचा शेवट दिसत नाही. इस्रायल-हमास युद्धाला 7 ऑक्टोबर रोजी सुरुवात झाली, जेव्हा हमासने इस्रायलवर हल्ले करण्यास सुरुवात केली.

हमासने इस्रायलवर 500 रॉकेट लाँचर डागले होते. त्याच दरम्यान, हमासच्या हल्ल्यात 1200 इस्रायली मारले गेले आणि सुमारे 260 लोकांना ओलीस ठेवण्यात आलं. हमासच्या हल्ल्यानंतर बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासविरोधात युद्धाची घोषणा केली.

इस्रायल-हमास युद्धाच्या 100 दिवसांच्या काळात अनेक देशांनी दोघांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. एक आठवड्याच्या युद्धविरामात इस्रायल आणि हमासने त्यांच्या ताब्यातील लोकांना सोडलं. हमासच्या ताब्यात असलेल्या 250 इस्रायली नागरिकांपैकी 121 लोकांना सोडण्यात आले.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू युद्धाच्या सुरुवातीपासूनच एका गोष्टीवर ठाम आहेत. जोपर्यंत ते हमासला पूर्णपणे नष्ट करत नाही तोपर्यंत युद्ध संपवणार नाहीत, असं त्याचं म्हणणं आहे. यासाठी त्यांनी आपल्या लष्कराला गाझा पट्टीवर खुलेआम हल्ले करण्याची परवानगी दिली आहे.

इस्रायलने गाझा पट्टीतील हमासच्या ठिकाणांवर शेकडो हवाई हल्ले केले आहेत. या काळात अनेक निवासी इमारतीही कोसळल्या आहेत. या काळात हजारो सामान्य पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले. त्याची संख्या 25 हजारांच्या जवळपास पोहोचली आहे.

इस्रायलविरुद्धच्या युद्धात हमासला अनेक इस्लामी देशांचा पाठिंबाही मिळाला. या देशांमध्ये कतार, इराण, तुर्की आणि पाकिस्तान प्रमुख आहेत. मात्र, चीन आणि रशियानेही पॅलेस्टाईनला पाठिंबा देत इस्रायलच्या आक्रमणाचा तीव्र निषेध केला आहे.

इस्रायलला पाठिंबा देणाऱ्या देशांमध्ये भारत, अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन आणि जर्मनी यांचा समावेश आहे. एकट्या गाझामध्ये इस्रायल-हमास युद्धात आतापर्यंत 23,708 लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे मरण पावलेल्या इस्रायलींची संख्या 1,300 पेक्षा जास्त आहे.

जखमींची आकडेवारी पाहिली तर ती भयावह आहे. या युद्धात आतापर्यंत जवळपास 60 हजार पॅलेस्टिनी जखमी झाले आहेत. याशिवाय इस्त्रायलींची संख्या 8 हजारांच्या आसपास आहे.

इस्रायल-हमास युद्धात गाझामध्ये मोठ्या प्रमाणावर विनाश पाहायला मिळत आहे. या काळात इस्रायलच्या हल्ल्यामुळे 56 टक्के घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. गाझामधील रुग्णालयेही उद्ध्वस्त झाली आहेत.

गाझामधील एकूण 36 रुग्णालयांपैकी केवळ 15 अर्धवट कार्यरत आहेत. इस्रायलच्या हल्ल्यात 121 रुग्णवाहिका उद्ध्वस्त झाल्या आहेत. पॅलेस्टिनी नागरिकांना विनाशकारी उपासमारीचा सामना करावा लागत आहे.

पॅलेस्टिनी सरकारच्या आकडेवारीनुसार, 5 लाख 76,600 लोक उपासमारीने त्रस्त आहेत, तर गाझामधील 69 टक्क्यांहून अधिक शाळा इमारतींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे 6 लाख 25 हजार लोक शाळेपासून वंचित राहिले आहेत.

पॅलेस्टिनी सरकारच्या आकडेवारीनुसार, 5 लाख 76,600 लोक उपासमारीने त्रस्त आहेत, तर गाझामधील 69 टक्क्यांहून अधिक शाळा इमारतींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे 6 लाख 25 हजार लोक शाळेपासून वंचित राहिले आहेत.