शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Iran War: होर्मुझ सामुद्रधुनी बनली मृत्यूचा रस्ता! इराणने तीन जहाज उडवली; हल्ल्यानंतरचे भयावह फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 13:56 IST

1 / 7
इराण युद्धामुळे अनेक देशांना होणार तेल आणि गॅस पुरवठा जवळपास ठप्प झाला आहे. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल जहाजांना जाण्यास बंदी घातली आहे. जहाज पुढे येत असल्यास इराणकडून आता हल्ले केले जात आहेत.
2 / 7
इराणने गेल्या काही तासांमध्ये तब्बल तीन तेल जहाजांवर हल्ला केला. यात अमेरिका, ग्रीक आणि गुजरातच्या दिशेने येणाऱ्या एका जहाजाचा समावेश आहेत. त्यामुळे हार्मुझची सामुद्रधुनी पेटल्याचीच स्थिती निर्माण झाली आहे.
3 / 7
इराणने गुजरातकडे निघालेले तेल जहाज मयुरी नारीवर हल्ला केला. थायलंडचे हे जहाज ११ मार्च रोजी संयुक्त अरब अमिरातील खलिफा बंदरावरून निघाले होते. स्थानिक वेळेप्रमाणे सकाळी ८.१५ वाजता या जहाजाने बंदर सोडले होते.
4 / 7
इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सने तेल जहाजावर हल्ला केला. इराणने म्हटले आहे की, तेल जहाजाला पुढे न येण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत जहाज होर्मुझ सामुद्रधुनीच्या दिशेने येत होते. त्यानंतर त्यावर हल्ला करण्यात आला.
5 / 7
इराणने अमेरिकेच्या ११ मार्च रोजी रात्री सेफसी विष्णू या तेल जहाजावरही हल्ला केला. ४८ हजार मेट्रीक टन इतके ज्वलनशील इंधन घेऊन निघाले होते. एका बोटीने जहाजावर हल्ला केला. त्यानंतर आगीचे मोठे लोळ उठले. यात एका भारतीयाचा मृत्यू झाला आहे. इराकच्या बसरा बंदराजवळ ही घटना घडली.
6 / 7
इराणने ग्रीकच्या एका बोटीलाही लक्ष्य केले. अमेरिका आणि ग्रीकच्या बोटीवर एकाच वेळी हल्ला केला गेला. इराकने तातडीने जहाजावरील कर्मचाऱ्यांना बाहेर काढले आणि सुरक्षित ठिकाणी नेले.
7 / 7
अमेरिका-इस्रायलने युद्ध सुरू केल्यानंतर इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद केला आहे. त्यामुळे या युद्धाची तीव्रता वाढली आहे. अनेक देशांना होणारा तेल आणि गॅस पुरवठा विस्कळीत झाला आहे. भारतावर याचा परिणाम जास्त झाला आहे.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणWarयुद्धCrude Oilखनिज तेलFuel Crisisइंधन टंचाई