By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 16:28 IST
1 / 6अमेरिका आणि इस्राइलने इराणविरोधात सुरू केलेल्या कारवाईमुळे भीषण संघर्षाला तोंड फुटलं आहे. या संघर्षाच्या पहिल्या चार दिवसांमध्येच अमेरिका आणि इस्राइलने मिळून इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनेई यांना ठार मारले आहे. केवळ खामेनेईच नाही तर इराणमधील दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीमधीलही अनेक बडे नेते आणि कमांडर मारले गेले आहेत. तसेच इराणच्या संरक्षण व्यवस्थेलाही खिळखिळे करून टाकले आहे. मात्र एवढं सारं होऊनही इराणकडून होणारा प्रतिकार कमी झालेला नाही. इराण इस्राइलसोबतच इतर आखाती देशांमध्ये असलेल्या अमेरिकेच्या तळांना लक्ष्य करत आहे. इराण क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा मारा करत आहे. तसेच अमेरिका आणि इस्राइलविरोधात लढण्यासाठी इराणकडून ३-फेज रणनीतीचा अवलंब करण्यात येत आहे. ही रणनीती खालील प्रमाणे आहे. 2 / 6इराणच्या फेज ३ रणनीतीचे तीन भाग आहेत. त्यातील पहिला भाग आहे तो शत्रूला आंधळं करणं, त्यानंतर त्याची संरक्षण प्रणाली कमकुवत करणं आणि शेवटी मोठा हल्ला करून त्याला पराभूत करणं. ही तीन टप्प्यात चालणारी रणनीती आहे. त्याला ब्लाईंड, डिप्लिट आणि ओव्हरव्हेल्म असं म्हटलं जातं. या रणनीतीच्या माध्यमातून आपल्याकडील स्वस्तातल्या हत्यारांद्वारे अमेरिकेच्या महागड्या संरक्षण प्रणालीची दमछाक करण्याचा इराणचा डाव आहे. 3 / 6यातील पहिला टप्पा आहे तो म्हणजे शत्रूला आंधळं करणं. म्हणजेच शत्रूचे डोळे असलेल्या रडार, सेंसर आणि कमांड सेंटर नष्ट करणे. इराण स्वस्तातले स्वार्म ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे अमेरिकेच्या इंटीग्रेटेड सेंसर नेटवर्क, रडार आणि कमांड अँड कंट्रोल नोड्वर हल्ला करतो. हे स्वस्तातले ड्रोन आणि क्षेपणास्त्रे रडारला टार्गेट करून शत्रूला आंधळं करू टाकण्यात येतं. त्यामुळे शत्रूला होणाऱ्या हल्ल्यांची माहिती उशिरा मिळते. म्हणूनच सुरुवातीच्या टप्प्यात इराणने स्वस्तातले ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर केला. जेणेकरून इस्राइल आणि अमेरिकेचं या हल्ल्याकडे दुर्लक्ष होईल.4 / 6या ३ फेज रणनीतीचा दुसरा टप्पा म्हणजे शत्रूच्या हवाई संरक्षण प्रणालीला थकवून जेरीस आणणे. त्यांच्याकडील इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांना संपुष्टात आणहे हे होय. इराण स्वस्तातले ड्रोण आणि क्षेपणास्त्रे शत्रूच्या दिशेने मोठ्या प्रमाणात डागतो. मात्र या क्षेपणास्त्रांना रोखण्यासाठी इस्राईल आणि अमेरिकेकडे पेट्रियाट किंवा थाड क्षेपणास्त्र प्रणाली आहे. मात्र ती खूप महागडी आहे. त्यामुळे स्वस्तातली हत्यारे वापरून शत्रूला ती रोखण्यासाठी महागड्या हत्यारांचा वापर करायला लावून त्यांचा युद्धाचा खर्च वाढवणे हा इराणचा इरादा आहे. सद्यस्थितीत इराणने केलेले हल्ले रोखताना आखाती देशांना मोठ्या प्रमाणावर अब्जावधी डॉलर खर्च करावे लागत आहे. मात्र इराणकडे शस्त्रांचा मोठा साठा शिल्लक आहे. तसेच त्यामुळे अमेरिकेची संरक्षण बॅटरी कमकुवत झाली आहे.5 / 6तिसरा आणि अंतिम टप्पा म्हणजे ओव्हरव्हेल्म म्हणजेच शत्रूला पूर्णपणे घेरणं. जेव्हा शत्रूची संरक्षण प्रणाली कमकुवत होते. इंटरसेप्टर संपुष्टात येतात, तेव्हा इराण आपल्या मोठ्या आणि विध्वंसक अशा हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे, बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आणि हेल्ड बॅक सिस्टिमद्वारे हल्ला करतात. ही क्षेपणास्त्रे खूप वेगवान आणि अचूक असतात जी कमकुवत संरक्षण प्रणालीला सहजपणे भेदू शकते. इराणच्या हल्ल्यांमुळे अमेरिकन जहाजे, तळ आणि महत्त्वपूर्ण ठिकाणांचं नुकसान करू शकतात. 6 / 6अमेरिका आणि इस्राइलविरुद्ध सुरू असलेल्या संघर्षात इराणच्या ३ फेज रणनीतीला सध्यातरी अंशत: यश मिळताना दिसत आहे. इराणने स्वस्तातले ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे अमेरिका आणि इस्राइलला थकवले आहे. मात्र अमेरिका आणि इस्राइलने इराणचे क्षेपणास्त्र प्रक्षेपक आणि कमांड सिस्टिमला मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त केलं आहे. एवढंच नाही तर अयातुल्लाह खामेनेई यांच्या मृत्युमुळे इराणमधील नेतृत्वाचं संकट निर्माण झालं आहे.