By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 08:22 IST
1 / 8इराण-अमेरिका, इस्रायल या युद्धाने १५-१६ हून अधिक देश व्यापले आहेत. आखाती देशांत हाहाकार उडाला आहे, केव्हा कुठून कुणाचा ड्रोन, मिसाईल येईल आणि धमाका करेल याची शाश्वती या भागात राहिलेली नाही. इराणची क्षेपणास्त्रे इस्रायलपर्यंत जात आहेत. परंतू, युद्ध लादणारी अमेरिका मात्र सुरक्षित राहिली आहे. 2 / 8या अमेरिकेच्या सैन्याला लष्करी तळ उभारण्यास परवानगी देणारे आखाती देश मात्र धुमसत आहेत. अशातच असा एक देश आहे, ज्याच्या वाट्याला दोन्ही बाजुची क्षेपणास्त्रे, ड्रोन हल्ले आलेले आहेत. या एकाच देशावर अमेरिकाही हल्ले करतेय आणि इराण देखील. 3 / 8इराक हा देश दोन सत्तांच्या 'क्रॉसफायर'मध्ये अडकला आहे. इराण आणि अमेरिका या दोन्ही देशांनी इराकमधील विविध लक्ष्यांवर एकाच वेळी क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागल्याने इराकची राजधानी बगदाद हादरून गेली आहे.4 / 8इराणने इराकमधील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केले आहे, तर प्रत्युत्तरादाखल अमेरिकेने इराकमधील इराण समर्थित गटांच्या ठिकाणांवर बॉम्बफेक सुरू केली आहे. यामुळे इराकचे सार्वभौमत्व धोक्यात आले असून सामान्य नागरिक या संघर्षात भरडले जात आहेत.5 / 8इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने (IRGC) बगदाद आणि इरबिलमधील अमेरिकन दूतावासाजवळ अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत.6 / 8अमेरिकेने आपल्या प्रगत ड्रोनद्वारे बगदादमधील संशयास्पद ठिकाणांवर हल्ले केले आहेत. अमेरिकेचा दावा आहे की, हे हल्ले स्वतःच्या संरक्षणासाठी केले जात आहेत.7 / 8इराक सरकारने या दोन्ही देशांच्या कृत्याचा निषेध केला असून, आपल्या देशाला युद्धाचा आखाडा बनवू नका, असे आवाहन केले आहे.8 / 8या नव्या घडामोडींमुळे केवळ आखाती देशातच नव्हे, तर जगभरात चिंतेचे वातावरण आहे. इराक हा तेलाचा मोठा उत्पादक देश असल्याने, या हल्ल्यांचा थेट परिणाम जागतिक तेल बाजारावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.