इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 15:14 IST2025-06-19T15:05:22+5:302025-06-19T15:14:41+5:30

Ayatollah Khamenei News: अयातुल्ला खामेनेई आणि उत्तर प्रदेश यांचे कनेक्शन समोर येत आहे. अर्धांगवायूने ग्रस्त असले तरी खामेनेई यांनी इराणची सत्ता ताब्यात ठेवली आहे.

इराणने इस्त्रायलच्या हॉस्पिटलवर मिसाईल हल्ला केल्यानंतर आता इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनेई यांना संपविण्याचा इशारा इस्रायलने दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून खामेनेई हे जगभरात चर्चेत आहेत.

अर्धांगवायूने ग्रस्त असले तरी खामेनेई यांनी इराणची सत्ता ताब्यात ठेवली आहे. चार दशकांपूर्वी राजाची राजवट उलथवून खामेनेई यांच्या कुटंबाने इराणवर एकछत्री अंमल ठेवला आहे. हे खामेनेई हे मुळचे भारतातील असल्याचे सांगितले तर तुम्हाला खरे वाटणार नाही, परंतू हे खरे आहे.

अयातुल्ला खामेनेई आणि उत्तर प्रदेश यांचे कनेक्शन समोर येत आहे. १९ व्या शतकात खामेनेई यांचे पणजोबा सय्यद अहमद मुसावी यांचा जन्म बाराबंकी जवळच्या किंतूर गावात झाला होता. मुसावी हे १८३० मध्ये किंतूरहून इराणला गेले आणि तिथेच स्थायीक झाले.

वयाच्या ४० व्या वर्षी, पणजोबा सय्यद अहमद मुसावी अवधच्या नवाबासोबत तीर्थयात्रेसाठी इराकला गेले होते. इराकहून दोघेही इराणला पोहोचले आणि अहमद मुसावी खोमेन नावाच्या गावात स्थायिक झाले.

भारतातील आहोत हे लोकांच्या लक्षात यावे म्हणून त्यांनी आडनावाला जोडून हिंदी असा शब्द वापरण्यास सुरुवात केली. यानंतर लोक त्यांना सय्यद अहमद मुसावी हिंदी म्हणून ओळखू लागले.

पुढे इराणमध्ये मोठी क्रांती घडली. 1970-80 च्या दशकात इराणचा तत्कालीन राजा मोहम्मद रजा शाह पहलवी याने इराणमधील महिलांना नग्न करून बाजारात उभे करण्यास सुरुवात केली होती.

सैयद यांचा नातू आणि अयातुल्ला अली खामेनेई यांचे वडील रुहोल्ला खामेनेई हे या महिलांचे शरीर कपड्यांनी झाकत असत. ही एक छोटीशी गोष्ट होती पण तिचा खूप दूरगामी परिणाम झाला. रुहोल्ला खामेनेई यांना जनतेचा पाठिंबा मिळत गेला आणि राजाची सत्ता उलथवून लावण्यात आली.

पाश्चात्य देशांच्या इशाऱ्यावर काम करणारा राजा जनतेवर अत्याचार करत होता. रुहोल्ला खामेनेईंनी त्याला विरोध केला म्हणून त्यांना देशाबाहेर काढले गेले. एवढेच नाही तर ७ जानेवारी १९७८ रोजी एका इराणी वृत्तपत्रातून राजाने खामेनेई यांना भारतीय एजंटही म्हटले होते. त्यानंतर खरी क्रांती घडायला सुरुवात झाली.

खामेनेईंच्या समर्थनार्थ लोक पेटून उठले, रस्त्यावर उतरले. अखेर घाबरून १६ जानेवारी १९७९ रोजी राजा इराणमधून पळून गेला. १ फेब्रुवारी १९७९ रोजी अयातुल्ला खामेनेई १४ वर्षांनी इराणला पोहोचले. ११ फेब्रुवारी १९७९ रोजी इराणमध्ये इस्लामिक सरकार स्थापन झाले. रुहोल्ला खामेनेईंना इराणचे पहिले सर्वोच्च नेते घोषित करण्यात आले. त्यांचा वारसा आताच्या अयातुल्लांकडे आला.

इराणच्या इस्लामिक क्रांतीने संपूर्ण इराण बदलून टाकले. पण अयातुल्लाह रुहोल्ला खामेनेई यांनी जो विचार केला होता ते तसे घडले नाही. सत्ता परिवर्तन म्हणजे पुढे जाणे परंतु इस्लामिक क्रांतीमुळे संपूर्ण इराण धार्मिक बनला. यामुळे विचारसरणीला मर्यादा आल्या आणि इराण संपूर्ण मध्य पूर्वेत एकाकी पडला.