शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 17:41 IST

1 / 7
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन ४-५ डिसेंबर रोजी भारत दौऱ्यावर येत आहेत. यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. रशियन सुरक्षा एजन्सीची टीम आधीच भारतात दाखल झाली आहे. खरे तर पुतिन यांच्या सुरक्षेची तयारी, ही इतर देशांच्या प्रमुखांच्या तुलनेत काहीशी वेगळी असते.
2 / 7
अदृश्य सेना - 'द मॉस्को टाइम्स'च्या एका वृत्तानुसार, पुतिन जिथे कुठे प्रवासावर असतात, तिथे त्यांच्यापूर्वी, त्यांची एक 'अदृश्य सेना' (Invisible Army) तैनात झालेली असते. या सेनेतील अधिकारी सामान्य नागरिकांमध्ये मिसळून स्थानिक परिस्थितीचा आढावा घेतात.
3 / 7
अलीकडेच जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या जाली आणि स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावरही हल्ल्याच्या प्रयत्न झाला. या पार्श्वभूमीवर पुतिन यांची सुरक्षा अधिक कडेकोट करण्यात आली आहे.
4 / 7
पोर्टेबल लॅब पुतिन यांच्यासोबत एक पोर्टेबल लॅबही असते. या लॅबमद्ये त्यांना खाण्यासाठी देण्यात येणाऱ्या सर्व पदार्थांची तपासणी केली जाते.
5 / 7
खाजगी स्वयंपाकी आणि साहित्य - महत्वाचे म्हणजे, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे खाजगी आचारीही नेहमीच त्यांच्यासोबत असतात. पुतिन कोणत्याही देशात असोत, केवळ त्यांच्या आचाऱ्याने तयार केलेले अन्नच खातात. महत्वाचे म्हणजे, त्याचीही लॅबमध्ये तपासणी होते. विशेष म्हणजे, किराणामाल आणि पिणीही पुतिन यांच्यासोबतच असते.
6 / 7
पोर्टेबल टॉयलेट - सर्वात महत्त्वाचे म्हणजे, खाण्यापिण्याच्या साहित्यासोबतच पोर्टेबल टॉयलेट (Portable Toilet) देखील पुतिन यांच्यासोबत असते. यामागचे कारण सांगताना असे बोलले जाते की, जर राष्ट्रपतींशी संबंधित कोणताही अपशिष्ट पदार्थ (Waste) दुसऱ्या देशात राहिला, तर त्याच्या तपासणीद्वारे त्यांच्या आरोग्याविषयी माहिती मिळू शकते, जी राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दाही ठरू शकते.
7 / 7
यामुळे भारत दौऱ्यावर येतानाही या सर्व गोष्टी पुतीन यांच्यासोबत असतीलच. या सर्व गोष्टी त्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित आहेत. यामुळे, भारत दौऱ्यावरही त्यांच्या सुरक्षेशी संबंधित, या सर्व गोष्टींची काळजी रशियन एजन्सीज घेतील.
टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनrussiaरशियाIndiaभारतfoodअन्नWaterपाणी