CoronaVirus Live Updates : परिस्थिती गंभीर! कोरोनाचा धोका वाढतोय, 'ही' 2 लक्षणं आढळल्यास करू नका दुर्लक्ष अन्यथा...; रिसर्चमधून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 03:22 PM2021-07-28T15:22:55+5:302021-07-28T15:49:35+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येने पुन्हा एकदा चिंता वाढली आहे.

कोरोनाच्या महाभयंकर संकटापुढे सर्वच देश हतबल झाले आहेत. जगभरातील रुग्णांची संख्या ही तब्बल 19 कोटींवर पोहोचली असून लाखो लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे.

वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येने पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.

एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण होण्याआधी त्याच्यामध्ये काही लक्षणं आढळून येतात. ज्याकडे दुर्लक्ष करणं अत्यंत महागात पडण्याची शक्यता आहे. वेळीच सावध न झाल्यास अथवा योग्य उपचार न केल्यास ते जीवघेणं ठरू शकतं.

कोरोनाची दोन लक्षणं आढळल्यास त्याकडे चुकून देखील दुर्लक्ष करू नका कारण ते घातक ठरू शकतं. अमेरिकेत झालेल्या रिसर्चमधून याबाबत माहिती देण्यात आली आहे. काही गोष्टींमुळे जीवाला धोका निर्माण होतो.

रिसर्चनुसार, श्वास घेण्यास त्रास होणे (Breathing problem in corona) आणि छातीत सतत दुखणे (Chest pain) ही दोन लक्षणं जाणवत असल्यासं वेळीच काळजी घ्या. डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते उपचार सुरू करा.

इंफ्लूएंजा अँड अदर रेस्पिरेटरी व्हायरसेस जर्नल (Influenza and Other Respiratory Viruses journal) मध्य़े हा रिसर्च प्रकाशित करण्यात आला आहे. यामध्ये ही दोन लक्षणं आढळल्यास ते अत्यंत घातक ठरू शकतात.

श्वास घेताना त्रास होणं. रक्तातील ऑक्सिजनची लेव्हल कमी असणं हे संकेत धोकादायक आहेत. त्यामुळे वेळीच आरोग्याची काळजी घ्या. वृद्धांना कोरोनाचा जास्त धोका असल्याचं देखील रिसर्चमध्ये म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोनातून बऱ्या झालेल्या लोकांमध्ये ब्रेन हॅमरेजसारख्या भयंकर आजारांचा धोका वाढत असल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे रुग्णांना आरोग्यविषयीच्या आणखी समस्यांचा सामना करावा लागत आहे.

दिल्लीतील एका रुग्णालयाने आपल्या रिपोर्टमधून याबाबत दावा केला आहे. कोरोनातून ठीक झाल्यानंतर रुग्णांमध्ये न्यूरोल़ॉजिकल समस्यांचा अधिक घातक स्वरूपात वाढत असल्याचं दिसून येत आहे.

दिल्लीतील मूलचंद रुग्णालयाने आपल्या रिपोर्टमध्ये ज्या रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांच्यात ब्रेन हॅमरेज आणि अनेक गंभीर समस्या वाढत आहेत. डॉक्टरांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

रुग्णालयातील सीनियर न्यूरोसर्जन डॉ. आशा बक्शी यांनी 37 टक्के रुग्णांमध्ये डोकेदुखी सारखी लक्षणं दिसून येत आहेत. तर 26 टक्के रुग्णांमध्ये चव समजत नसल्याचं समोर आलं आहे.

आरोग्यविषयीच्या या समस्यांमुळे रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यचे प्रमाण वाढत आहे. कोरोना व्हायरस हा फक्त फुफ्फुसाचा आजार नाही तर न्यूरोलॉजिकल समस्या देखील असल्याचं डॉक्टर बक्शी यांनी म्हटलं आहे.

ओपीडीमध्ये येणारे जवळपास 60 टक्के रुग्णांना तणाव, एकटेपणा आणि आत्महत्या करण्याचे विचार सतावत आहेत. यातील अनेक रुग्णांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती मूलचंद रुग्णालयाने दिली आहे.

मास्क, सोशल डिस्ंटसिंग, होम क्वारंटाईन, आयसोलेशनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असताना धडकी भरवणारी आकडेवारी सातत्याने समोर येत आहे. अशातच रिपोर्टमधून नवनवीन माहिती समोर येत आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!