शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

भारताची मोठी खेळी! अमेरिकेचा दबाव झुगारला, आता रशियातून येणार 'खजाना'; एका खास निर्णयावरही शिक्कामोर्तब!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 17:12 IST

1 / 7
इराण आणि इस्रायलमधील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या ऊर्जा सुरक्षेसाठी पुन्हा एकदा रशियाकडे वळणार आहे. जानेवारी महिन्यात अमेरिकेच्या दबावाखाली रशियन कच्च्या तेलाच्या खरेदीत कपात करणाऱ्या भारताने आता आपला निर्णय बदलला असून, रशियाकडून होणारी तेल आयात पुन्हा दुप्पट होऊन ४० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते.
2 / 7
'जेरुसलेम पोस्ट'ने दिलेल्या वृत्तानुसार, रशिया आता भारताला थेट लिक्विफाइड नॅचरल गॅस (LNG) पुरवठा करण्यास तयार झाला आहे. युक्रेन युद्धानंतर पहिल्यांदाच रशिया भारताला थेट गॅस पुरवठा करणार आहे.
3 / 7
१९ मार्च रोजी दिल्लीत रशियाचे उप ऊर्जा मंत्री पावेल सोरोकिन आणि भारताचे केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्यात झालेल्या बैठकीत यावर 'तोंडी संमती' झाली. यामुळे रशियाकडून होणारा कच्च्या तेलाचा पुरवठाही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
4 / 7
इराण युद्धाचा परिणाम - अमेरिका-इस्रायलचे इराणवरील हल्ले आणि त्यानंतर इराणने दिलेल्या प्रत्युत्तरामार्फत जागतिक ऊर्जा बाजार हादरला आहे. 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'मधील तणावामुळे भारताच्या तेल आणि गॅस पुरवठ्यावर थेट परिणाम झाला आहे, कारण भारताचा निम्मा पुरवठा याच मार्गाने होतो.
5 / 7
याचा परिणाम देशांतर्गत बाजारपेठेतही जाणवू लागला असून पेट्रोल पंपांवरील रांगा आणि इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे चिंतेचे वातावरण आहे.
6 / 7
यापूर्वी अमेरिकेने भारतीय वस्तूंवर लादलेल्या व्यापार शुल्कामुळे (Tarrif) भारताने रशियन तेलाची खरेदी काही प्रमाणात कमी केली होती. मात्र, मध्य-पूर्वेतील संकटामुळे निर्माण होणारी महागाई, रुपयाची घसरण आणि निर्यातीतील संभाव्य घट रोखण्यासाठी भारताने पुन्हा एकदा रशियाच्या दिशेने पाऊल टाले आहे.
7 / 7
यासंदर्भात बोलतानना माजी राजनयिक अजय मल्होत्रा म्हणाले, भारताने आपल्या राष्ट्रीय हिताला प्राधान्य देत रशियासोबतचे जुने आणि विश्वासार्ह संबंध अधिक घट्ट करण्याचा मार्ग निवडला आहे.
टॅग्स :IndiaभारतrussiaरशियाAmericaअमेरिकाNarendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पVladimir Putinव्लादिमीर पुतिन