चीनची हालत बेक्कार! जिनपिंग यांनी अँजेला मार्केलसह अनेक बड्या नेत्यांना फिरवला फोन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 08:36 AM2020-09-15T08:36:17+5:302020-09-15T08:50:22+5:30

युरोपच्या दौर्‍यावर गेलेल्या चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनासुद्धा काही देशांनी कडक संदेश दिले आहेत.

भारत-चीन सीमा वादविवाद, हाँगकाँगमधील दादागिरी, तैवान आणि दक्षिण चीन समुद्रासारख्या मुद्द्यांवरून चीनवर जगभरातून टीका होत आहे.

युरोपच्या दौर्‍यावर गेलेले चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनासुद्धा काही देशांनी कडक संदेश दिले आहेत. चीनच्या सर्व प्रमुख देशांसोबतचे बिघडलेले संबंध पाहून आता राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग स्वत: मैदानात उतरले आहेत.

प्राप्त झालेल्या अहवालानुसार, सोमवारी जिनपिंग यांनी स्वत: हून जर्मनीच्या चान्सेलर अँजेला मार्केल यांच्यासह अनेक युरोपियन युनियनच्या नेत्यांशी फोनवर संभाषण केले.

चीनच्या म्हणण्यानुसार, या चर्चा खूप अर्थपूर्ण ठरल्या आहेत. यावेळी चीन आणि युरोपियन युनियनमधील व्यापार, गुंतवणुकीच्या करारावर चर्चा वेगवान करण्यास सहमती दर्शविली आहे.

या फोन कॉल्समध्ये जिनपिंग यांनी राजकीय मुद्द्यांचा सामना करणे आणि युरोपियन युनियनशी संबंध वाढवण्याचा विश्वास यांसारख्या विषयांवर चर्चा केली आहे.

युरोपियन युनियन चीनची सर्वात मोठी व्यापारी भागीदार असूनही, त्यांच्याशी संबंधित असलेल्या 27 देशांचे बीजिंगबद्दलचे मत भिन्न आहे आणि ते चीनला प्रतिस्पर्धी म्हणून देखील पाहतात.

सध्या युरोपियन युनियनचे नेतृत्व असलेले मार्केल यांना कौन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल, कमिशनचे अध्यक्ष उर्सुला फॉन डेर लेयन आणि युनियनचे परराष्ट्र धोरण प्रमुख जोसेफ बोरेल यांचे पाठबळ आहे.

हाँगकाँगमध्ये नव्याने लागू केलेला चीनचा कायदा युरोपियन युनियनच्या फारसा पचनी पडलेला नाही. असे म्हटले आहे की, या कायद्यामुळे प्रादेशिक स्वायत्तता कमी झाली आहे.

अनेक देशांनी हाँगकाँगशी असलेले संबंधही कमी केले आहेत. ज्यामध्ये जर्मनी आणि फ्रान्स प्रमुख आहेत.

चिनी परराष्ट्रमंत्री वांग यांनी बर्लिनमधील चेक प्रजासत्ताकाच्या सिनेटचे अध्यक्ष मिलोस व्हेरसिल यांना भारी किंमत मोजण्याचा इशारा दिला.

त्यानंतर लगेचच त्याच बैठकीत बर्लिनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी वांग यी यांना सांगितले होते की, आपण त्यांचा व्यासपीठ कोणत्याही युरोपियन देशाविरुद्ध वापरू देणार नाही. त्यांनी चेक प्रजासत्ताकाबरोबर जर्मनीची एकताही दाखविली.