Howdy Modi म्हणजे काय रे भाऊ?; जाणून घ्या अमेरिकेतील 'मोदीसोहळ्या'बद्दल सर्व काही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 09:48 AM2019-09-21T09:48:20+5:302019-09-21T09:54:50+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. 22 सप्टेंबर रोजी मोदी अमेरिकेच्या टेक्सासमधील ह्यूस्टन सिटीमध्ये असणार आहेत. ह्यूस्टनमध्ये हाउडी मोदी नावाच्या मेगा शोमध्ये ते सहभागी होतील. सध्या हाउडी मोदीची चर्चा अनेक ठिकाणी आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का? की नेमकं हाउडी मोदी आहे काय...

दुसऱ्या कार्यकाळातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पहिला अमेरिका दौरा आहे. त्याठिकाणी ते संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करणार आहेत. मात्र त्याआधी ते एका मेगा शोला हजेरी लावतील. यामध्ये 50 हजारपेक्षा अधिक लोक उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेदेखील उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

यापूर्वी नरेंद्र मोदी 29 सप्टेंबर 2014 रोजी मेडिसन स्क्वायर येथे आणि 27 सप्टेंबर 2015 रोजी सिलिकॉन वॅलीमध्ये गेले होते. 22 सप्टेंबर 2019 रोजी ह्यूस्टन येथे NRG स्टेडियममध्ये Howdy Modi Mega Show मध्ये ते सहभागी होतील. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अमेरिका-भारत यांच्यातील संबंध, संस्कृती आणि व्यापाराबाबत चर्चा होणार आहे.

हा आहे Howdy Modi शब्दाचा अर्थ, दक्षिण-पश्चिम अमेरिकेत Howdy हा शब्द अभिवादन करण्यासाठी वापरला जातो. हाउडी मोदी म्हणजे How do you Modi असा आहे. या कार्यक्रमात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांपासून सामान्य लोकांपर्यंत सर्वजण एक विचारणार आहे ते म्हणजे मोदी, तुम्ही कसे आहात? या कार्यक्रमाची उत्सुकता सगळ्यांनाचा लागून राहिली आहे.

हाउडी मोदी या महासोहळ्याप्रमाणे अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्लोबल पीसमेकर पुरस्कारही दिला जाणार आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून त्यांनी भारतात केलेल्या जागरुकतीसाठी नरेंद्र मोदींचा सन्मान केला जाणार आहे.

अमेरिकेत 24 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी करणार आहेत. तसेच 22 सप्टेंबर रोजी होणाऱ्या हाउडी मोदी या कार्यक्रमाला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सहभागी होतील आणि 50 हजार मूळ भारतीय अमेरिकी या कार्यक्रमाला हजेरी लावतील.