डोनाल्ड ट्रम्प यांची नजर असलेल्या ग्रीनलँडमध्ये भारतीय रुपयाची ताकद किती? १००० रुपयांत तिथे काय मिळेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 13:30 IST2026-01-10T13:26:02+5:302026-01-10T13:30:53+5:30

ग्रीनलँडमध्ये भारतीय रुपयाची नेमकी किंमत काय आहे आणि भारताचे १००० रुपये तिथे किती होतात?

निसर्गाचे अद्भूत सौंदर्य आणि बर्फाच्छादित प्रदेशासाठी प्रसिद्ध असलेले ग्रीनलँड सध्या जागतिक राजकारणामुळे चर्चेत आले आहे. मात्र, जर तुम्ही एक पर्यटक म्हणून तिथे जाण्याचा विचार करत असाल, तर तिथले चलन आणि भारतीय रुपयाची किंमत समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. ग्रीनलँडमध्ये भारतीय रुपयाची नेमकी किंमत काय आहे आणि भारताचे १००० रुपये तिथे किती होतात?

अनेक पर्यटकांना असे वाटते की ग्रीनलँडचे स्वतःचे वेगळे चलन असेल, पण तसे नाही. ग्रीनलँड हा डेन्मार्क साम्राज्याचा एक भाग आहे, त्यामुळे तिथे अधिकृत चलन म्हणून 'डेनिश क्रोन' वापरले जाते. तिथे सर्व व्यवहार, मग ते रोखीने असोत वा डिजिटल, याच चलनात केले जातात.

जानेवारी २०२६ च्या ताज्या विनिमय दरांनुसार, भारतीय रुपया हा डेनिश क्रोनच्या तुलनेत थोडा कमकुवत आहे. १ भारतीय रुपया = सुमारे ०.०७१ डेनिश क्रोन होतात. या हिशोबाने, जर तुम्ही भारतातून १००० रुपये घेऊन ग्रीनलँडमध्ये गेलात, तर त्याचे तिथे केवळ ७१.१० डेनिश क्रोन होतील.

७१ डेनिश क्रोनमध्ये ग्रीनलँडमध्ये काय येईल, हा मोठा प्रश्न आहे. तिथल्या राहणीमानाचा खर्च पाहता, ही रक्कम स्थानिक वाहतुकीच्या एखाद्या छोट्या प्रवासासाठी किंवा अगदी साध्या स्नॅक्ससाठी पुरेशी ठरू शकते.

मात्र, तिथे हॉटेलमध्ये जेवण करणे किंवा राहणे भारताच्या तुलनेत खूपच महाग आहे. कारण, तिथे १ डेनिश क्रोन मिळवण्यासाठी तुम्हाला सुमारे १४.०६ भारतीय रुपये मोजावे लागतात.

डेनिश क्रोन हे एक अतिशय स्थिर चलन मानले जाते, कारण ते युरोपियन विनिमय यंत्रणेद्वारे थेट 'युरो'शी जोडलेले आहे. त्यामुळे त्याच्या मूल्यात फार मोठे चढ-उतार पाहायला मिळत नाहीत. विशेष म्हणजे, डेन्मार्कप्रमाणेच ग्रीनलँडमध्येही आता रोख रकमेचा वापर कमी झाला आहे. तिथे बहुतांश व्यवहार क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा मोबाईल ॲप्सच्या माध्यमातूनच होतात.

त्यामुळे जर तुम्ही ग्रीनलँडच्या ट्रिपचे बजेट आखत असाल, तर रुपयाच्या तुलनेत तिथली महागाई लक्षात घेऊनच पैशांचे नियोजन करणे फायद्याचे ठरेल.