साता समुद्रापार गणरायाचा गजर, बेल्जियममध्ये बाप्पाचं दणक्यात स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 16:17 IST2018-10-09T16:02:06+5:302018-10-09T16:17:22+5:30

साता समुद्रापार बेल्जियममध्ये बाप्पांची मनोभावे आणि पारंपरिक रितीरिवाजानूसार पूजा करण्यात आली.

बेल्जियमच्या मराठी मंडळाने दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही गणेशोत्सव मोठ्या दिमाखात आणि थाटामाटात साजरा केला.

ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली.

लहान-थोरांच्या उपस्थितीत बेल्जियममध्ये बाप्पाची प्रतिष्ठापना करून मनोभावे पूजा करण्यात आली.

सुरेख फुलांच्या सजावटीमध्ये गणराज विराजमान झाले. तसेच श्रींची पूजा आणि मंगल आरती करण्यात आली.

दरवर्षी प्रमाणे यंदाही सर्वांनी गणेशोत्सवासाठी जय्यत तयारी केली होती.

गणेशोत्सावादरम्यान अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.

आपली संस्कृती परदेशातही जपता यावी यासाठी येथील मराठी बांधव एकत्र येत हे उत्सव साजरे करतात.