दक्षिण फ्रान्समधील 900 हेक्टर जंगलाला भीषण आग; 500 अग्निशमन जवान तैनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 16:43 IST2019-08-16T16:40:11+5:302019-08-16T16:43:39+5:30

दक्षिण फ्रान्समधील चीड येथील 900 हेक्टर जंगलात भीषण आग लागल्याने राख झाली आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी 500 हून अधिक अग्निशमन जवान तैनात करण्यात आले आहेत.
कैरकैसन शहरच्या दक्षिण पूर्व औड येथील जंगलात बुधवारी दुपारी ही आग लागली.
फिलीप फैबर यांच्या माहितीनुसार रात्री 40 किमी प्रति तास वेगाने येणाऱ्या हवेमुळे आग पसरत गेली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
औड अग्निशमन विभागाचे अधिकारी फिलीप फैबर यांनी सांगितले की, जवळपास 900 हेक्टर परिसरात असणाऱ्या या जंगलाला आग लागली. त्यामुळे अनेक झाडं या आगीत जळून राख झाली आहेत.