EL Mencho Girlfriend: गर्लफ्रेंड अडकली अन् कुख्यात मेंचोचा खेळ खल्लास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 13:27 IST2026-02-25T13:23:33+5:302026-02-25T13:27:18+5:30

अमेरिकी गुप्तचरांनी स्थानिक यंत्रणांच्या मदतीने टाकलेल्या जाळ्यात मैंचोची गर्लफ्रेंड अडकली अन् एल मेंचो संपला.

मेक्सिकोतील 'मोस्ट वाँटेड' कुख्यात ड्रग तस्कर एल मेंचो तेथील लष्कर व सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या कारवाईत मारला गेल्यानंतर तो सापडला कसा, याची माहिती आता बाहेर येत आहे.

अमेरिकी गुप्तचरांनी स्थानिक यंत्रणांच्या मदतीने टाकलेल्या जाळ्यात मैंचोची गर्लफ्रेंड अडकली अन् मैचो संपला. मेंचो असा अडकला जाळ्यात अमेरिकेच्या हिट लिस्टवर असलेला मैंचो गुप्तहेरांनी त्याच्या गर्ल फ्रेंडवर टाकलेल्या जाळ्यात अडकला आणि मारला गेला.

मैंचो याचा या गर्ल फ्रेंडवर प्रचंड विश्वास होता. फक्त तिलाच मेंचो नेमका कुठे आहे हे माहीत असे. याच गर्ल फ्रेंडवर गुप्तहेरांनी जाळे टाकले आणि त्यात यश आले.

मैचो याच्या गर्ल फ्रेंडचा एक विश्वासू साथीदार गुप्तहेरांनी हेरला. त्याला गळ घालून गुप्तहेर संस्था या महिलेपर्यंत पोहचल्या. तिचा हा साथीदार मेंचोच्या प्रत्येक हालचाली सुरक्षा यंत्रणांना देत राहिला.

२१ फेब्रुवारीला मेंचो याची 3 गर्लफ्रेंड त्याला सोडून निघाली पण मेंचो आपल्या सुरक्षा रक्षकांसह तिथेच थांबला. ही माहिती मिळताच तापाल्पा भाग लष्कराचे जवान व इतर सुरक्षा संस्थांनी घेरला. डाव लक्षात येताच मैचो सहकार्यासह जंगलाच्या दिशेने पळाला. भयंकर चकमकीत गंभीर जखमी होऊन मारला गेला.