मालकाची पुलावरून उडी मारून आत्महत्या, कुत्रा तिथेच बसून ४ दिवसांपासून पाहतोय वाट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 04:44 PM2020-06-09T16:44:05+5:302020-06-09T16:54:07+5:30

एकवेळ माणूस माणसाचा विश्वासघात करेल, पण कुत्रा कधीही मालकाचा विश्वासघात करणार नाही.

कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत असून, अनेक देश त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. कोरोनाच्या समस्येपायी सगळेच घरात बंदिस्त आहेत. त्यामुळे रस्त्यावरची रहदारीही कमी झालेली आहे.

. कुत्रा हा मनुष्यासाठी सर्वात विश्वासू प्राणी समजला जातो. एकवेळ माणूस माणसाचा विश्वासघात करेल, पण कुत्रा कधीही मालकाचा विश्वासघात करणार नाही.

त्याचासारखा इमानदार प्राणी नाही. त्यामुळे बरेच जण कुत्रा पाळतात आणि त्याच्यावर प्रेम करतात. मालकाशी निष्ठा असल्याचं प्रकार चीनमध्येही दिसून आला होता.

मालकाचा रुग्णालयात मृत्यू झाला तरीही कुत्रा चार दिवस रुग्णालयात बसून मालक बाहेर येण्याची वाट पाहत होता. ते पाहून सगळेच हळहळले होते.

असंच एक दुसरं प्रकरण समोर आलं आहे. चीनमध्ये एका मालकानं पुलावरून उडी मारून आयुष्य संपवलं, पण कुत्रा त्याच पुलावर चार दिवसांपासून बसून राहिला होता.

आपल्या मालकानं पुलावरून खाली उडी मारून आत्महत्या केल्याचं त्याच्या गावीही नव्हतं. तो आपला मालक कधी तरी परत येईल याचीच चार दिवसांपासून वाटत पाहत होता.

जवळपास कुत्रा चार दिवस वाट त्या पुलावरच बसून होता. जवळपास राहणार्‍या एका व्यक्तीने चार दिवसांपासून पुलावर बसून असलेल्या कुत्र्याचा फोटो घेतला आणि सोशल मीडियावर टाकला.

त्यानंतर तो वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. कुत्र्याची मालकाशी असलेली निष्ठा पाहून त्या माणसाने त्याला दत्तक घेण्याचा विचार केला आणि पकडण्यास गेला. पण कुत्रा तिकडून पळून गेला.

स्थानिक स्वयंसेवकांच्या मदतीने वुहान स्मॉल अ‍ॅनिमल प्रोटेक्शन असोसिएशनचे संचालक डु फॅन आता कुत्रा शोधत आहेत, जेणेकरून त्याच्या राहण्याची व्यवस्था करता येईल.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, कुत्रा 30 मे रोजी संध्याकाळी त्याच्या मालकाचा पाठलाग करत पुलाजवळ पोहोचला, जिथून त्याच्या मालकाने उडी मारली आणि त्याचा मृत्यू झाला. मालकाच्या मृत्यूनंतरही कुत्रा त्या ठिकाणी चार दिवस बसून होता.

Read in English