CoronaVirus: कोरोनातून बरे झालेले 91 रुग्ण पुन्हा संक्रमित; 'या' देशाची चिंता वाढली!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 02:23 PM2020-04-13T14:23:23+5:302020-04-13T14:32:23+5:30

कोरोना विषाणूनं संक्रमित होणाऱ्यांची संख्या वाढत असली तरी बरे झालेले रुग्णांनीसुद्धा चिंता वाढवली आहे. परंतु कोरोनातून मुक्तता झालेल्या रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

दक्षिण कोरियामध्ये 40 जण कोरोनातून बरे झाले होते, परंतु त्यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

तसेच यापूर्वीसुद्धा 51 जणांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आलं होतं, त्यांना होम क्वारंटाइमध्ये ठेवलं होतं, तेसुद्धा पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह झाले आहे, त्यामुळे आरोग्य तज्ज्ञांची चिंता वाढली आहे.

कोरोनातून एकदा का रुग्ण बरा झाल्यानंतर त्याची रोगप्रतिकारशक्ती वाढते, असा एक समज होता. परंतु या नव्या प्रकरणांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

दक्षिण कोरियामध्ये आतापर्यंत अशा प्रकारे 91 रुग्ण आढळून आले असून, ते बरे झाल्याचं पहिल्यांदा वाटलं होतं, परंतु कालांतरानं ते पुन्हा एकदा कोरोनानं संक्रमित झाले आहेत.

त्यांची खबरदारीसाठी तपासणी केली गेली असता ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या प्रकारामुळे दक्षिण कोरियातील सामान्य लोकही आता घाबरू लागले आहेत.

कोरिया सेंटर फॉर डिजिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनचे संचालक जोंग युन केओंग यांच्या म्हणण्यानुसार, आरोग्य अधिकारी कोरोनातून मुक्त झालेले रुग्ण पुन्हा पॉझिटिव्ह कसे झाले, याच्या ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, कोरिया विद्यापीठाच्या गुरो हॉस्पिटलमधील संसर्ग रोगांचे तज्ज्ञ असलेले प्राध्यापक किम वू जू म्हणाले, 'हा आकडा आणखी पुढे जाईल. 91ही फक्त एक सुरुवात आहे.

कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याबद्दल दक्षिण कोरियाची जगभरातून प्रशंसा झाली होती.

दक्षिण कोरियाने वेळेत रुग्णांची चाचणी आणि इतर पावले उचलून कोरोनावर विजय मिळवल्याचं सांगितलं जात होतं. परंतु या देशात संक्रमितांची संख्या 10,450 एवढी असून, 208 जणांचा मृत्यू झाला आहे.