CoronaVirus News: ...अन् 'ती' वेळ चीनवर पुन्हा आली; तब्बल १० कोटी जनतेवर होणार परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 02:48 PM2020-05-20T14:48:11+5:302020-05-20T14:52:51+5:30

चीनच्या वुहानमधून जगभरात पसरलेल्या कोरोनानं थैमान घातलं आहे. जगातील कोरोनाबाधितांचा आकडा ५० लाखांच्या घरात पोहोचला आहे.

चीनच्या वुहानमध्ये सर्वप्रथम कोरोनाचा रुग्ण वाढला. मात्र चीननं लॉकडाऊन करत कोरोनावर नियंत्रण मिळवलं.

चीननंतर कोरोनानं युरोपियन देशांसह अमेरिकेत हाहाकार माजवला. या देशांच्या तुलनेत चीननं परिस्थिती लवकर नियंत्रणात आणली.

आता मात्र पुन्हा एकदा कोरोनाची घरवापसी झाली आहे. त्यामुळे चीनवर पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे.

चीननं ईशान्य भागात लॉकडाऊन केला आहे. या भागात १० कोटींहून जास्त नागरिक वास्तव्यास आहेत.

कोरोना संक्रमणाचा वेग वाढत असल्यानं प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यामुळे जिलिन प्रांतातल्या शहरांमधील दुकानं पुन्हा बंद करण्यात आली आहेत.

ईशान्य चीनमधील बस, रेल्वे सेवादेखील बंद केली गेली आहे. शाळादेखील बंद करण्यात आल्या आहेत. याशिवाय हजारो जणांना क्वारंटीन करण्यात आलं आहे.

चीनमधील कोरोनाचं संकट संपलं, असं तिथल्या नागरिकांना वाटलं होतं. मात्र चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना परतला आहे.

ईशान्य चीनमधील कोरोना संक्रमणाची आकडेवारी वुहान इतकी मोठी नाही. मात्र वुहानचा अनुभव पाहता चीननं लॉकडाऊन घोषित केला आहे.

चीनमध्ये आतापर्यंत ८२ हजार ९६५ जणांना कोरोनाची लागण झाली असून ४ हजार ६३४ जणांचा मृत्यू झाला आहे.