शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : लढ्याला यश! Jubilant ने लाँच केलं कोरोनावरचं औषध, जाणून घ्या किंमत अन् बरंच काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2020 1:22 PM

1 / 14
जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ही तब्बल 18,451,042 वर गेली आहे. तर आतापर्यंत 697,289 जणांचा मृत्यू झाला आहे.
2 / 14
कोरोनापुढे अनेक प्रगत देश हतबल झाले आहेत. या संकटाचा सामना करत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र याच दरम्यान एक कोटी लोकांनी कोरोनाची लढाई जिंकली आहे.
3 / 14
कोरोनाग्रस्तांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असून जगभरात 11,682,473 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत.
4 / 14
जगभरात कोरोनावर लस आणि औषध शोधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी याबाबतच्या चाचण्या सुरू असून संशोधनाला यश येत आहे.
5 / 14
कोरोनाच्या संकटात एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. Jubilant ने महत्त्वाची घोषणा केली असून कोरोनावरचं एक औषध लाँच केलं आहे.
6 / 14
ज्युबिलेंट लाइफ सायन्सेस यांची सहाय्यक कंपनी ज्युबिलेंट जेनेरिक्स यांनी कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन लॉन्च केल्याची माहिती दिली आहे.
7 / 14
रिपोर्टनुसार, भारतात हे इंजेक्शन JUBI-R या नावाने विकले जाणार आहे. ज्याची किंमत जवळपास 4700 रुपये असणार आहे. भारतासह 127 देशांमध्ये हे औषध उपलब्ध आहे.
8 / 14
कोरोना व्हायरसवर उपचार करण्यासाठी कंपनीकडून 100 एमजी वायल 1000 रुग्णालयात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या रुग्णालयांना हे औषध कंपनीच्या डिस्ट्रिब्युशन नेटवर्कअंतर्गत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
9 / 14
मे महिन्यात ज्युबिलेंटने गिलीड सायन्सेस लिमिटेडसह एक नॉन-एक्सक्लुसिव्ह डील साइन केलं होतं. यानंतर कंपनीला रेमडेसिवीरला रजिस्ट्रेशन, मॅन्युफॅक्चरिंग आणि विक्रीची परवानगी मिळाली आहे.
10 / 14
कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिवीर अत्यंत प्रभावी ठरत आहे. त्यामुळेच या इंजेक्शनचा खूप जास्त फायदा होणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
11 / 14
कोरोनाने थैमान घातलेले असतानाच अनेक दिलासादायक घटना समोर येत आहे. जगभरात कोरोनासंदर्भात संशोधन सुरू असून शास्त्रज्ञांना यश मिळत आहे. याच दरम्यान कोरोनाच्या या लढ्याला आणखी एक मोठं यश मिळालं आहे.
12 / 14
शास्त्रज्ञांना काही दिवसांपूर्वी कोरोनाला रोखणारी तब्बल 21 औषधं सापडल्याची माहिती मिळली होती. ही औषधं कोरोना व्हायरसचा प्रसार रोखू शकतात. सॅनफोर्ड बर्नहम प्रीबायस मेडिकल डिस्कवरी इन्स्टिट्यूट ऑफ अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी हे संशोधन केलं आहे.
13 / 14
शास्त्रज्ञांनी केलेले हे संशोधन कोरोनाच्या उपचारात मदत करू शकते. कोरोना व्हायरसची प्रतिकृती रोखण्यासाठी औषधांचे विश्लेषण केले गेले. लॅब टेस्टमध्ये अँटीव्हायरल अ‍ॅक्टिव्हिटी असलेले 100 रेणू (molecules) आढळले. हा रिसर्च नेचर जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे.
14 / 14
रिसर्चनुसार, ही औषधे रुग्णांसाठी सुरक्षित आहेत. तसेच यापैकी चार कंपाऊंड हे रेमडेसिवीरसोबत एकत्रित करून कोरोनाच्या उपचारासाठी वापरली जाऊ शकतात.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmedicinesऔषधंIndiaभारत