CoronaVirus Live Updates : कोरोनाचा उद्रेक! अमेरिकेत दररोज आढळतात 1 लाख नवे रुग्ण; हॉस्पिटलमध्ये जागाच नाही, परिस्थिती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 03:40 PM2021-08-07T15:40:16+5:302021-08-07T15:59:57+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनापुढे अमेरिकेसारखा मोठा देशही हतबल झाला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे

जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. असं असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे.

कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 20 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर 42 लाखांहून अधिक लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

कोरोनापुढे अमेरिकेसारखा मोठा देशही हतबल झाला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे.

पुन्हा एकदा अमेरिकेत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज कोरोनाचे एक लाखाहून अधिक नवे रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णांच्या संख्येत मोठा वाढ झाली असून हॉस्पिटलमध्ये आता जागाच शिल्लक नसल्याचं चित्र आहे.

जूनच्या अखेरीस दररोज सरासरी 11 हजार नवे रुग्ण आढळून येत होते. पण आता ही रुग्णसंख्या तब्बल एक लाख सात हजार 143 वर पोहोचली आहे. कोरोनाची लस न घेतलेल्यामंध्ये वेगाने प्रसार होत आहे.

फ्लोरिडा, लुइसियाना आणि मिसीसिप्पीमधील हॉस्पिटल्स हे रुग्णांनी भरून गेले आहेत. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटीचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अमेरिकेत आता पुन्हा कोरोनाचा विस्फोट झाला आहे.

एका दिवसात कोरोनाचे तब्बल 1 लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. डेल्टा व्हेरिएंटने चिंता वाढली आहे. पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठा वाढ होत असलेली पाहायला मिळत आहे.

अमेरिकेत कोरोनाचा सर्वात जास्त धोका असणाऱ्या भागांमधील लस घेतलेल्या नागरिकांना पुन्हा एकदा मास्क घालावा लागणार आहे. आरोग्य प्रशासनाने लसीकरण झालेल्या या नागरिकांना मास्क वापरण्याचे निर्देश दिले आहेत.

Centers for Disease Control and Prevention च्या संचालकांनी पत्रकार परिषदेत मास्क वापरण्यासंबंधी निर्देश दिले. डेटानुसार लस अत्यंत प्रभावी आहे, मात्र डेल्टाच्या काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये संसर्ग वाढण्याचा धोका असल्याचं म्हटलं आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी लसीकरणामध्ये आपण अजून चांगली कामगिरी करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. तसेच लसीकरणाचं प्रमाण वाढवण्यासाठी नवे निर्णय घेतले जाणार असल्याचं म्हटलं आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये जास्त लोकांनी लस घेतलीच नसल्याचं समोर आलं आहे. तर अमेरिकेतील काही भागात संसर्गाची 80 टक्के नवी प्रकरणं ही डेल्टा व्हेरिएंटची आढळून आली आहेत.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. अशातच कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने (Delta Variant) थैमान घातले आहे. अनेक देशांमध्ये रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.

ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, चीन, डेन्मार्क, भारत, इंडोनेशिया, इस्राईल, पोर्तुगाल, रशिया, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, ब्रिटन या देशांमध्ये ‘डेल्टा’चा प्रभाव 75 टक्क्यांहून अधिक असल्याचं दिसलं आहे.