शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus चीनच दोषी! अमेरिकेचे आरोप खरे ठरले; कोरोनाचे सॅम्पल नष्ट केल्याचे मान्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 12:58 PM

1 / 11
चीनमधील वुहान शहरामध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आणि त्यानंतर त्याचा प्रसार जगभर झाला आहे. चीनने कोरोना व्हायरचे सुरुवातीचे सॅम्पल नष्ट केल्याचा आरोप अमेरिकेने चीनवर केला होता. तसेच हा चीनी व्हायरस असल्याचेही आरोप झाले होतो. यावर आज चीनने मोठी चूक केल्याचे मान्य केले आहे.
2 / 11
गेल्या महिन्यात अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनी चीनवर गंभीर आरोप केले होते. यामध्ये त्यांनी चीनने कारोना व्हायरसचे सुरुवातीचे सॅम्पल दिले नसल्याचा आरोप केला होता. तसेच हे सॅम्पल नष्ट केल्याची शंकाही त्यांनी उपस्थित केली होती.
3 / 11
कोरोना व्हायरसची निर्मिती ही कोणत्याही प्राण्यापासून झालेली नसून ती वुहानच्याच लॅबमधून झाल्याचे पुरेसे पुरावे सापडले असल्याचा दावा पॉम्पिओ यांनी केला आहे.
4 / 11
अमेरिकेच्या पथकाने चीनमध्ये तपास करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, याला चीनने मान्यता दिली नव्हती. अखेर अमेरिकेने आणि अन्य देशांनी गुप्तहेरांकडून चौकशी करण्यास सुरुवात केली होती.
5 / 11
न्यूजवीकच्या बातमीनुसार शुक्रवारी चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या प्रमुखांनी हा आरोप मान्य केला आहे. लीऊ डेंगफेंग यांनी सांगितले की, ३ जानेवारीला चीन सरकारच्या आदेशानुसार अनधिकृत लॅबमधून कोरोना व्हायरसचे सॅम्पल नष्ट करण्याक आले.
6 / 11
मात्र, त्यांनी चीनने काहीतरी लपविण्याच्या उद्देशाने हे सॅम्पल नष्ट केल्याचा आरोप फेटाळून लावला. लॅबमध्ये बायोलॉजिकल सुरक्षा आणि पुढे काही अपघात होऊ नये यासाठी हे व्हायरस संपविण्यात आल्याचे डेंगफेंग यांनी सांगितले.
7 / 11
अशा अनधिकृत लॅबमध्ये व्हायरस ठेवणे धोक्याचे आणि बेकायदेशीर होते. यामुळे चीनच्या आरोग्य कायद्यांनुसार हे व्हायरस संपविणे आवश्यक होते. यानुसार सरकारने आदेश दिल्याचे डेंगफेंग यांनी सांगितले.
8 / 11
डेंगफेंग यांनी सांगितले की, ही आदेश तेव्हा देण्यात आले जेव्हा कोरोनाचे दुसरे रुप SARS-CoV-2 क्लास-२ चा सर्वात घातक व्हायरस म्हणून घोषित करण्यात आला होता.
9 / 11
चीनला अमेरिकेने कोरोनाबाबत केलेले संशोधन आणि त्यावर शोधल्या जाणाऱ्या औषधांची माहिती हवी आहे. यामुळे त्यांनी ही माहिती मिळविण्यासाठी सायबर हल्ला केला आहे. अमेरिकेच्या एजन्सी आणि मेडिकल संस्थांवर सायबर हल्ले वाढू लागले आहेत. यामुळे हॉस्पिटल, रिसर्च लॅब, हेल्थ केअर प्रोव्हायडर आणि फार्मासिटीकल कंपन्यांवर याचा मोठा परिणाम होत असल्याचे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
10 / 11
चीनने कोरोनाची माहिती जगापासून लपविली. यामुळे जगभरातील लोकांना खूप वेदना झाल्या आहेत. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने पारदर्शकता ठेवलेली नसल्याचा आरोप केला आहे. आताही चीन कोरोनासंबंधीची माहिती जगापासून लपवत आहे. चीनला याची किंमत मोजावीच लागेल असा इशारा माईक पॉम्पिओ यांनी दिला होता.
11 / 11
चीनमधून आम्हाला कोरोना व्हायरसच्या पहिल्या टप्प्यातील नमुने हवे आहेत. चीनने जे नमुने दिले आहेत ते बरोबर नाहीत, असा आरोप अमेरिकेने केला होता.
टॅग्स :Americaअमेरिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन