Corona Virus : चिमुकल्यांना विळखा! 'या' देशात कोरोनाचे थैमान; एका महिन्यात 1.30 लाख मुलं पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 15:02 IST
1 / 12वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गेल्या दोन-तीन वर्षांत लाखो लोकांचा या साथीमुळे मृत्यू झाला. हजारो मुले अनाथ झाली. अनेक देशांची अर्थव्यवस्था अशी ढासळली की ती अद्यापही पूर्णपणे सावरता आलेली नाही. 2 / 12कोरोनाने चीनमध्ये पुन्हा कहर केला. तेथे झिरो-कोविड पॉलिसी काढून टाकण्यात आल्याचे समजल्यानंतर, परिस्थिती इतकी बिघडली होती की, स्मशानभूमीत मृतदेह जाळण्यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत आगे. 3 / 12चीनसोबतच जपान, कोरियासह जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाची प्रकरणे चिंताजनक वेगाने वाढत आहेत. त्यामुळे भारत सरकारनेही अनेक खबरदारीची पावले उचलली आहेत. पण आता अमेरिकेतून कोरोनाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. 4 / 12अमेरिकेत कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. विशेषत: कोरोना खूप वेगाने लहान मुलांना विळखा घालत आहे. अमेरिकन एकेडमी ऑफ पीडियाट्रिक्स (एएपी) आणि चिल्ड्रन्स हॉस्पिटल असोसिएशनच्या ताज्या अहवालानुसार, गेल्या चार आठवड्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. 5 / 12अमेरिकेमधील जवळपास 1,30,000 मुलांना कोविड-19 चे निदान झाले आहे. 16 फेब्रुवारीपर्यंत, 15.4 मिलियनहून अधिक मुलांनी महामारी सुरू झाल्यापासून कोविड-19 साठी चाचणी घेतल्याची नोंद झाली आहे, शिन्हुआ वृत्तसंस्थेच्या रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे.6 / 12रिपोर्टनुसार, 16 फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात सुमारे 29,000 मुलांची COVID-19 साठी चाचणी पॉझिटिव्ह आली. एएपीने दिलेल्या माहितीनुसार, मुलांच्या आरोग्यावर साथीच्या रोगाचे तात्काळ परिणाम होतात त्यावर उपचार करणं गरजेचं आहे. 7 / 12लहान मुलांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्यावर दीर्घकाळ टिकणारे परिणाम होतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनामुळे अनेक देशांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रगत देश हतबल झाले आहेत. 8 / 12कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय करण्यात येत आहेत. असं असताना रिसर्चमधून टेन्शन वाढवणारी माहिती समोर आली आहे. कोरोनामधून बरे होऊन दोन वर्षानंतरही फुफ्फुस पूर्णपणे बरं झालेलं नाही, असं एका अभ्यासातून समोर आलं आहे.9 / 12'रेडिओलॉजी' नावाच्या सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की, जगभरात 60 कोटीहून अधिक लोक कोरोनापासून बरे झाले आहेत, परंतु तरीही त्यांच्या काही अवयवांना, विशेषत: फुफ्फुसात दीर्घकाळ संसर्ग होऊ शकतो.10 / 12चीनच्या वुहान येथे असलेल्या हुआझोंग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या मेडिकल कॉलेजच्या किंग यी आणि हेशुई शी यांनीहा अभ्यास केला आहे. या अभ्यासात कोविडमधून बरे झालेल्या 144 रुग्णांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये 79 पुरुष आणि 65 महिला होत्या, ज्यांचे सरासरी वय 60 वर्षे होते.11 / 12हे असे रुग्ण होते जे 15 जानेवारी ते 10 मार्च 2020 दरम्यान कोविडने बरे झाले होते. या लोकांचे 6 महिने, 12 महिने आणि दोन वर्षांचे तीन सीटी स्कॅन झाले. सीटी स्कॅनमध्ये असे दिसून आले की कोविडमधून बरे झाल्यानंतर दोन वर्षानंतरही त्यांच्या फुफ्फुसात अनेक समस्या होत्या.12 / 12फुफ्फुसात फायब्रोसिस, थिकनिंग, हनीकॉम्बिंग, सिस्टिक चेंज अशा अनेक समस्या दिसल्या आहेत. अभ्यासात असे आढळून आले की 6 महिन्यांनंतर 54 टक्के रुग्णांच्या फुफ्फुसात समस्या निर्माण झाल्या होत्या. दोन वर्षानंतरही 39 टक्के रुग्णांची फुफ्फुसे पूर्णपणे बरी झालेली नाहीत.