पॅलेस्टाइनमध्ये विद्यार्थ्यांनी ख्रिसमसचा लुटला आनंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 21:57 IST2017-12-20T21:52:03+5:302017-12-20T21:57:47+5:30

पॅलेस्टाइन : ख्रिसमसचा सण अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर सध्या जगातील विविध भागांमध्ये ख्रिसमसच्या तयारीने वेग पकडला आहे.
येथील गाझा सिटीत असलेल्या अमेरिकन स्कूलमधील विद्यार्थ्यांकरिता ख्रिसमस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सांताक्लॉजने विद्यार्थ्यांसोबत ख्रिसमस साजरा केला. तसेच, या स्कूलमधील विद्यार्थ्यांना सांताक्लॉजने विविध भेटवस्तू दिल्या.
याचबरोबर पॅलेस्टाइनमधील अनेक शहरे ख्रिसमस सणाच्या पार्श्वभूमीवर रोषणाईने सजली आहेत.
जगभरात ख्रिसमसची तयारी जवळपास पूर्ण होत आली आहे. बहुतांश देशांत या दिवशी सुटी जाहीर करण्यात आलेली आहे.