चीनमध्ये नववर्षाची धूम, 'लुणार'साठी देश सज्ज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2018 16:11 IST2018-02-16T16:09:27+5:302018-02-16T16:11:43+5:30

नववर्षाचं स्वागत करण्यासाठी चीन सज्ज झाला आहे. चीनमध्ये गुरुवारपासून तेथील नोकरदार वर्गाला एक आठवड्याची सुट्टी मिळाली आहे.
चीनमध्ये नववर्षाला वसंत उत्सव या नावानेही ओळखलं जातं. नवीन वर्षाचं सेलिब्रेशन तेथे एक महिना चालतं.
एक आठवड्याच्या सुट्टीच्या काळात तेथील सर्व ऑफिस, व्यापार बंद असतात. लोक सुट्ट्यांसाठी गावाल किंवा विदेशात फिरायला जातात.
चीनच्या कॅलेंडरनुसार नागरीक नववर्षाला इयर ऑफ द डॉग असंही म्हणतात.