धक्कादायक! DNA मध्ये फेरफार करत चीन बनवतोय 'Super Soldiers'; इतके घातक की...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 01:21 PM2022-12-15T13:21:38+5:302022-12-15T13:27:25+5:30

सैनिकांपर्यंत पोहचण्याआधी सुरुवातीला जीन एडिटिंग काय आहे? हे समजून घेऊ. तंत्रज्ञानाद्वारे DNA बदलला जातो जेणेकरून काही खास घटक जोडले किंवा काढले जाऊ शकतात. गरजेनुसार उपयोगी पडू शकेल अशा अनेक जीवांवर हा प्रयोग करून नवीन प्रजात तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा प्रकारच्या वनस्पती-भाज्याही बनवल्या जात आहेत, ज्यामुळे आजारी पडत नाहीत आणि ज्यातून अधिक पोषण मिळू शकते.

गेल्या दोन दशकांपासून अनेक देश एकमेकांवर आरोपही करत आहेत की ते आपल्या सैनिकांसोबतही जीन एडिटिंग करत आहेत. दोन वर्षांपूर्वी अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने म्हटले होते की चीनने हे काम आधीच सुरू केले आहे.

ब्रिटनने याच गोष्टीचा पुनरुच्चार केला की, महासत्ता बनण्याच्या हव्यासापोटी चीन सैनिकांचं बायोलॉजी बदलत आहे. रशियाबद्दल असे बोलले जाते की ते अत्यंत गुप्त मार्गाने जीन एडिटिंगचं काम करत आहे जेणेकरून अचानक ते जगात दहशत पसरवू शकतील.

वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये तत्कालीन इंटेलिजन्स चीफ जॉन रॅटक्लिफ यांनी चीन कोणत्या प्रकारचे तंत्रज्ञान वापरतेय याचा खुलासा केला आहे. तेथे वापरल्या जाणार्‍या तंत्राला क्लस्टरड रेग्युलरली इंटरस्पेस्ड शॉर्ट पॅलिंड्रोमिक रिपीट्स म्हणतात.

यामध्ये DNA चा काही भाग बदलला जातो आणि नैसर्गिक डीएनएला त्याच्या जागी काम करण्याची परवानगी दिली जाते. जीनोम एडिटिंग अनेक तंत्रांपैकी, हे सर्वात कमी खर्चिक आणि फायदेशीर मानले जाते त्यामुळे याचा वापर देश करतात.

सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे आपल्याच सैनिकांच्या शरीरात बदल करताना चीन त्यांना अंधारात ठेवतो. सामान्य माणसांपासून ते भावनाहीन रोबोटमध्ये कधी बदलतील हे सैनिकांना माहीत नाही. नेचर बायोटेक्नॉलॉजी या सायन्स जर्नलमध्ये याबाबत एक अहवाल आला आहे.

या अहवालात असं म्हटलं आहे की, युद्धभूमीवर पोहोचल्यावर नरसंहार घडवून आणणारे असे सैनिक तर असतातच, पण सामान्य जीवनातही ते तितकेच निर्दयी होतात. आतापर्यंत याचा उपयोग भाज्या, फळे किंवा प्राण्यांच्या निरोगी जाती तयार करण्यासाठी केला जात होता.

परंतु आता मानवी जनुक एडिटिंग देखील अशा प्रकारे केले जात आहे. किमान कथितरित्या चीनने हे आधीच केले आहे. याची सुरुवात नवजात बाळांच्या एडिटिंगपासून झाली. नोव्हेंबर २०१८ मध्ये जगातील पहिले डिझायनर बाळ बनवण्यात यशस्वी झाल्याचं एका चिनी शास्त्रज्ञाने कबूल केले होते.

चीनच्या सर्दन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या या प्रयोगात दोन जुळ्या मुलींचे डीएनए एडिट करण्यात आले. ही बातमी आल्यानंतर मोठी खळबळ माजली होती. त्यानंतर संशोधनात असलेल्यांना शिक्षा देण्यात आली.

चीनसह इतर अनेक मोठ्या देशांवर सैनिकांच्या DNA बदलाचा आरोप केला जातो ज्यामुळे असे सैनिक बनवले जातात जे पूर्णपणे क्रूर असतात आणि दुखापत होऊनही लढत राहतात. झोप आणि भूक संपवणे हे देखील एक प्रमुख उद्दिष्ट आहे. जेणेकरुन रेशन संपल्यावर किंवा युद्ध चालू असताना सैनिकांनी हार मानू नये.

एप्रिल २०२१ च्या मध्यात, ब्रिटिश सरकारने यावर संशोधनासाठी ८०० दशलक्ष पौंड निधी दिला. एडवान्स संशोधन आणि इन्वेंशन संस्थेला दिलेल्या या निधीचा उद्देश सैनिकांमध्ये जीनोम तंत्रज्ञानाचा वापर करणे हा आहे.

अमेरिकन संशोधन संस्था DARPA च्या देखरेखीखाली हा निर्णय घेण्यात आला आहे. DARPA म्हणजेच डिफेन्स अॅडव्हान्स्ड रिसर्च प्रोजेक्ट्स एजन्सी REPAIR नावाच्या एका प्रकल्पावर काम करत आहे, ज्याचा उद्देश सैनिकांच्या मनाचा वापर करून त्यांना अधिक क्रूर आणि स्वार्थी बनवणे आहे.