अमेरिकेतील पाक दुतावासापुढे भारतीयांची निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2018 08:21 PM2018-01-09T20:21:37+5:302018-01-09T20:27:33+5:30

पाकिस्तानने फाशीची शिक्षा सुनावलेले कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांना इस्लामाबादेत नुकत्याच मिळालेल्या अमानवी वागणुकीचा भारतीय अमेरिकन्स, अफगाण आणि पाकमधील बलोच वंशाच्या गटाने पाकिस्तानच्या येथील दुतावासाबाहेर निदर्शने करून निषेध केला

कडाक्याच्या थंडीला तोंड देत निदर्शकांनी पाकिस्तानी दुतावासातील अधिका-यांना देण्यासाठी स्वत:सोबत सँडल्सही आणल्या होत्या

कुलभूषण जाधव यांच्यावरील खटला लष्करी न्यायालयाने चालवून सगळ्या आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केले गेले आहे, असे अमेरिकन फ्रेंडस ऑफ बलोचस्तानचे संस्थापक अहमार मुस्तिखान यांनी म्हटले.

मुस्तिखान यांनी ही अभिनव निदर्शने ‘चप्पल-चोर पाकिस्तान’ या नावाने आयोजित केली होती.

हातात असलेल्या फलकावर ‘चप्पल-चोर पाकिस्तान’ असे लिहले होतं