By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 13:09 IST
1 / 10इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खमेनेई यांच्या निधनानंतर, संपूर्ण जगाला एकच प्रश्न पडला आहे, तो म्हणजे, अमेरिका आणि इस्रायलनं खामेनेई आणि त्यांच्या सर्व टॉपच्या नेत्यांवर एवढा अचूक निशाणा कसा साधला? 2 / 10तर, फायनान्शियल टाईम्सने प्रसिद्ध केलेल्या एका वृत्तानुसार, गेल्य अनेक वर्षांपासून इस्रायलने तेहरानची ट्रॅफिक कॅमेरा सिस्टिमच हॅक केलेली होती. केवळ कॅमेरेच नाही, तर ते अहगदी मोबाइल नेटवर्कपर्यंत पोहोचले होते. लक्ष्य होतं, अयातुल्लाह खामेनेई आणि त्यांच्या संपूर्ण सुरक्षा गराड्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणं!3 / 10संबंधित वृत्तानुसार, तेहरानमधील बहुतांश ट्रॅफिक कॅमेरे इस्त्रायलने हॅक केले होते. या कॅमेऱ्यांचे फुटेज एन्क्रिप्ट करून देशाबाहेर पाठवले जात होते. यामाध्यमाने खामेनींचा आणि त्यांच्या गार्ड्सचा संपूर्ण 'मूव्हमेंट पॅटर्न' तयार करण्यात आला.4 / 10असा होता ऑपरेशनचा थरार - खरे तर, हे ऑपरेशन काही महिन्यांचे नव्हते, तर गेल्या अनेक वर्षांपासून यावर काम सुरू होते. इस्त्रायली गुप्तचर संस्था 'युनिट ८२००' आणि 'मोसाद' यांनी इराणच्या तांत्रिक यंत्रणेत खोलवर शिरकाव केला होता. 5 / 10कॅमेऱ्यांचे लाइव्ह फीड आणि मोबाइल नेटवर्क डेटाच्या मदतीने सुरक्षा रक्षकांच्या हालचाली टिपल्या जात होत्या. त्यांच्या गाड्यांचे पार्किंग आणि शिफ्ट बदलण्याच्या वेळा आदींची इत्थंभूत माहिती गोळा करण्यात आली. यावरून त्यांच्या दैनंदिन सवयी आणि हालचाली लक्षात आल्या.6 / 10कॅमेरे बनले मिसाईल, बॉम्ब - इस्त्रायलने शहरातील CCTV यंत्रणेचा वापर हेरगिरीसाठी केला. मोबाइल नेटवर्कमधील घुसखोरीमुळे नेमका कोणता फोन कोणत्या लोकेशनवर आहे, हे समजणे सोपे झाले. एका अर्थाने कॅमेऱ्यांनी अस्रायल साठी शस्त्राचेच काम केले नव्हे तेच खऱ्या अर्थाने मिसाइल आणि बॉम्ब बनले. 7 / 10जेव्हा हवी तेवढी माहिती जमा झाली, तेव्हा लोकेशन, वेळ आणि सुरक्षेतील त्रुटी लक्षात घेऊन, अचूक ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला. आणि नेमका निशाणा साधला गेला.8 / 10महत्वाचे म्हणजे, या सर्व दाव्यांना अधिकृतपणे पुष्टी मिळाली नसली तरी, डिजिटल पाळत या हल्ल्यात निर्णायक ठरली, हे स्पष्ट आहे. तज्ज्ञांच्या मते, 'आता युद्धे केवळ जमिनीवर अथवा अवकाशातच नव्हे, तर डिजिटल माध्यमानेही लढले जात आहे.9 / 10यात, कॅमेरे, मोबाइल नेटवर्क, इंटरनेट - हे सर्व संभाव्य लक्ष्य आहेत. यामुळे मजबूत सायबर क्षमता असलेले देश एकही गोळी न चालवताही मोठी आघाडी मिळवू शकतात.10 / 10यात, कॅमेरे, मोबाइल नेटवर्क, इंटरनेट - हे सर्व संभाव्य लक्ष्य आहेत. यामुळे मजबूत सायबर क्षमता असलेले देश एकही गोळी न चालवताही मोठी आघाडी मिळवू शकतात.