बॉर्डर ! कोई सरहद ना इन्हे रोके...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 15:28 IST2019-08-21T15:23:00+5:302019-08-21T15:28:19+5:30

अमेरिका आणि मेक्सिको बॉर्डरवरील हे विलक्षण भावनिक चित्र आहे. दोन देशातील लोकांच्या प्रेम-जिव्हाळ्याचं दर्शन इथं घडतं.
अमेरिका आणि मेक्सिक देशांमध्येही सीमारेषेवर तणावाचे वातावरण आहे.
केलिफोर्नियातील दोन प्राध्यपकांनी या बॉर्डरवरील तणावातही गोडवा आणि प्रेम निर्माण केलं आहे.
सीमारेषेवरील या भिंतींजवळ दोन्ही देशातील नागरिक आणि चिमुकल्यांसाठी खेळणी ठेवण्यात आली आहेत.
दोन देशातील नागरिक कुठल्याही स्पर्धेशिवाय सहजपणे गंमतशीर खेळ खेळताना दिसून येतात.
वजनकाट्याचा खेळ किती वजनदार वाटतो, जेव्हा दोन देशांच्या लोकांमध्ये असा जिव्हाला दिसतो
रिफ्युजी चित्रपटातील सोनू निगम आणि अल्का यागनिक यांचा पंछी नदीया पवन के झोके, कोई सरहद ना हमे रोके.... हे गाणं आठवल्याशिवाय राहणार नाही
गावाकडं बांधाचा वाद असतो, सीमारेषेवर बॉर्डरचा वाद असतो. पण हे हास्य पाहिल्यावर कसलीच बॉर्डर नको वाटते