Australia Fire: प्रशासनाचं स्तुत्य पाऊल; आग विझताच वन्य जीवांसाठी 'फूड ड्रॉप' सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 03:10 PM2020-01-14T15:10:39+5:302020-01-14T15:16:12+5:30

ऑस्ट्रेलियात लागलेली भीषण आग नियंत्रणात आल्यानंतर आता प्राणी, पक्ष्यांना खाद्य पुरवण्यास सुरुवात झाली आहे.

न्यू साऊथ वेल्स सरकारनं आगीचा फटका बसलेल्या भागांमधील प्राण्यांसाठी हेलिकॉप्टरमधून खाद्य पुरवण्यास सुरुवात केली आहे.

जंगलांना आगीचा फटका बसल्यानं वन्य जीवांना खाण्यासाठी फारसं काही उरलेलं नाही. त्यामुळेच सरकारकडून वन्य जीवांना मदत पोहोचवली जात आहे.

ऑस्ट्रेलियात लागलेल्या आगीत लाखो प्राण्यांचा मृत्यू झाला. यामध्ये कांगारु आणि कोआलांचं प्रमाण लक्षणीय आहे.

आगीमुळे प्रचंड नुकसान झालेल्या जंगलांमधल्या वॉलबीज, कोआलांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून गाजर, बटाट दिले जात आहेत.

आगीतून कसाबसा आपला जीव वाचवणाऱ्या प्राण्यांचा जीव भूकेमुळे व्याकूळ होऊ नये यासाठी प्रशासनाकडून करण्यात आलेल्या प्रयत्नांचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

आतापर्यंत २ हजार २०० किलोपेक्षा अधिक भाज्या वन्य प्राण्यांना देण्यात आल्या आहेत.