शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

"काहीही झाले तरी चीनच्या धमक्यांना घाबरणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 12:01 PM

1 / 10
कोरोना व्हायरस प्रकरणी सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी ऑस्ट्रेलियाने केली आहे. तेव्हापासून चीन ऑस्ट्रेलियाच्या व्यापारात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे असा चीनच्या धमक्यांपासून घाबरत नाही, असे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी गुरुवारी म्हटले आहे.
2 / 10
मुख्य व्यावसायिक भागीदार असलेल्या चीनकडून निर्यातीचा त्रास सहन करणार का?, असा सवाल ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांना गुरुवारी करण्यात आला. चीनने गेल्या दोन महिन्यांत अशी अनेक पावले उचलली आहेत, ज्यात ऑस्ट्रेलियाला आर्थिक नुकसान झाले आहे.
3 / 10
अमेरिका आणि युरोपियन देशांबरोबरच ऑस्ट्रेलिया देखील अशा देशांमध्ये सामील झाल की, जगभरात कोरोना व्हायरसचा प्रसार झाल्याप्रकरणी आंतरराष्ट्रीय चौकशीची मागणी करत आहेत. ऑस्ट्रेलिया आणि युरोपियन संघटना एकत्रित झाल्यानंतर गेल्या महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेच्या वार्षिक बैठकीत कोरोना व्हायरसच्या चौकशीच्या बाजूने मतदान झाले. ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयामुळे चीन नाराज झाला आणि आणि तेव्हापासून चीन धमक्या देऊन ऑस्ट्रेलियाला त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहे.
4 / 10
ऑस्ट्रेलियात शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या निर्णयावर विचार करावा, असे चीनच्या शिक्षण मंत्रालयाने मंगळवारी सांगितले. ऑस्ट्रेलियाची आंतरराष्ट्रीय शिक्षण प्रणाली ही त्याची चौथी मोठी निर्यात आहे. ऑस्ट्रेलियाला विदेशी विद्यार्थ्यांकडून वार्षिक 26 अब्ज डॉलर्सची कमाई होते. चीनच्या धमकीमुळे ऑस्ट्रेलियाला शिक्षण क्षेत्रातील कमाईत नुकसान सहन करावे लागू शकते.
5 / 10
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी रेडिओ स्टेशन 2GB ला मुलाखत दिली. यावेळी ते म्हणाले, 'ऑस्ट्रेलियाचा मुक्त बाजारपेठेला पाठिंबा आहे, परंतु कोठूनही धमक्या आला तरी आम्ही त्याला उत्तर म्हणून आमच्या तत्त्वांशी कधीही व्यवहार करणार नाही.'
6 / 10
चीनने अलीकडे ऑस्ट्रेलियाकडून बीफ आयात करण्यास बंदी घातली होती. तसेच, गेल्या आठवड्यात चीनने आपल्या पर्यटकांना म्हटले होते की, त्यांनी ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर जाण्याचे टाळावे. याशिवाय, चीनच्या अधिकाऱ्यांनी असा इशारा दिला आहे की, ऑस्ट्रेलियामध्ये कोरोना संकट काळात आशियाई लोकांवर जातीय हल्ले होण्याची शक्यता आहे.
7 / 10
स्कॉट मॉरिसन यांनी 3AWला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, ही एक अतिशय हास्यास्पद गोष्ट आहे आणि आम्ही ती फेटाळून लावतो. विद्यार्थी व पर्यटकांना दिलेल्या इशाऱ्यावर ऑस्ट्रेलियाने चीनचे परराष्ट्र मंत्रालय आणि कॅनबेरा येथील चिनी दूतावासाविरोधात निषेध नोंदविला आहे. ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे की त्यांचा देश पर्यटक आणि विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे.
8 / 10
मॉरिसन म्हणाले, ऑस्ट्रेलिया जगातील सर्वोत्तम शिक्षण आणि पर्यटनाच्या संधी देते. चीनी नागरिकांनी ऑस्ट्रेलिया निवडणे हा त्यांचा संपूर्ण निर्णय आहे. आपल्या देशातील शिक्षण आणि पर्यटन क्षेत्राच्या उत्कृष्टतेबद्दल मला खात्री आहे.
9 / 10
ऑस्ट्रेलियातील विद्यापीठांची संघटना 'द ग्रुप ऑफ एट'ने आहे की, आंतरराष्ट्रीय शिक्षणाचा उपयोग राजकीय प्यादे म्हणून केला जात आहे. ऑस्ट्रेलियामध्ये चिनी राजदूताने सुरुवातीला चिनी विद्यार्थी आणि पर्यटकांना धमकी दिली होती.
10 / 10
चीन ऑस्ट्रेलियाचा सर्वात मोठा व्यावसायिक भागीदार आहे. या दोन्ही देशांमध्ये दरवर्षी 235 अब्ज ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा व्यापार होतो. दोन देशांमधील व्यापार ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकलेला आहे, म्हणून चीनबरोबर व्यापार थांबल्यास ऑस्ट्रेलियाला मोठे नुकसान सहन करावे लागेल.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAustraliaआॅस्ट्रेलियाchinaचीनbusinessव्यवसायInternationalआंतरराष्ट्रीय