हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 13:55 IST
1 / 9Astronauts Spent Most Days In Space: भारताचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला काल(दि.२६) चार अंतराळवीरांच्या पथकासह आंतरराष्ट्रीय आंतराळ स्थानकात पोहोचले. शुक्ला हे अंतराळात जाणारे ६३४ वे अंतराळवीर ठरले आहेत. २८ तासांच्या प्रवासानंतर त्यांनी गुरुवारी आयएसएसमध्ये प्रवेश केला. पुढील १४ दिवस त्यांचा ISS मध्य मुक्काम असणार आहे. 2 / 9दोन महिन्यांपूर्वी भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि त्यांचा साथीदार बुच विल्मोर २८६ दिवस अंतराळात राहून परतले. पण, सुनिता या इतकी दिवस अंतराळात राहून परत आलेल्या पहिल्या व्यक्ती नाही. 3 / 9सुनिता विल्यम्स आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर सर्वाधिक वेळ घालवणाऱ्या अंतराळवीर नाहीत. तर, ओलेग कोनोनेन्को ही एक रशियन अंतराळवीर आहे, ज्याने पाच वेगवेगळ्या प्रवासात एकूण १११० दिवस अंतराळात घालवले आहेत.4 / 9 यानंतर, यादीत दुसरे नाव रशियन अंतराळवीर गेनाडी पडल्का यांचे आहे. त्यांनी पाच वेगवेगळ्या मोहिमांमध्ये ८७८ दिवस अंतराळात घालवले आहेत.5 / 9 रशियन अंतराळवीर सर्गेई क्रिलेव्ह सहा वेगवेगळ्या मोहिमांसाठी अंतराळात पोहोचले होते. येथे त्यांनी ८०३ दिवस अंतराळात घालवले आहेत.6 / 9 रशियन अंतराळवीर अलेक्झांडर कॅलेरी यांनी अवकाशात पाच यशस्वी मोहिमा पार पाडल्या आहेत. या मोहिमांमध्ये त्यांनी एकूण ७६९ दिवस तेथे घालवले आहेत.7 / 9 निवृत्त अमेरिकन अंतराळवीर पेगी अँनेट व्हिटसन यांनी चार वेगवेगळ्या मोहिमांमध्ये एकूण ६७५ दिवस अंतराळात घालवले आहेत.8 / 9 यानंतर, रशियन अंतराळवीर फ्योदोर युरचिखिन पाच अंतराळ मोहिमांचा भाग राहिले आहेत. या काळात ते ६७२ दिवस अंतराळात राहिले.9 / 9 पुढचा अंतराळवीर देखील रशियन आहे, त्याचे नाव युरी मालेन्चेन्को आहे. मालेन्चेन्को हा अंतराळात लग्न करणारा पहिला व्यक्ती आहे.