शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

बड्या नेत्यांची हत्या, शस्त्रसामुग्रीचा मोठा विध्वंस, तरीही इराण नाही झुकणार, युद्ध लांबवणार, ही आहेत ५ कारणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 16:54 IST

1 / 6
अमेरिका आणि इस्राइलने इराणविरोधात पुकारलेलं युद्ध आज २१ व्या दिवशीही सुरू आहे. तसेच अमेरिका आणि इस्राइलकडून इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांच्यासह अनेक बड्या नेत्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तसेच इराणच्या शस्त्रास्त्रांचे, लष्करी तळांचे तसेच पायाभूत सुविधांचे हल्ले करून मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आले आहे. तरीही इराणने युद्धात माघार घेण्याचे कुठलेही संकेत दिलेले नाहीत. उलट इराणकडून अधिक तीव्रतेने प्रतिहल्ले केले जात आहेत. त्यामुळे या युद्धात इराण न झुकता संघर्ष लांबवण्याची शक्यता आहे. तसेच त्याची पाच प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत.
2 / 6
आपल्याला कधीना कधी अमेरिकेसोबत युद्ध करावे लागेल याची जाणीव असलेल्या इराणने आपल्या संरक्षण धोरणामधून दीर्घकाळ युद्ध लढण्याची रणनीती आधीपासूनच आखली होती. तसेच इराणची विकेंद्रित मोझेक संरक्षण आणि चौथा उत्तराधिकारी योजना याच हेतूने तयार करण्यात आली होती. तसेच युद्धात मोठे नेते, कमांड सेंटर आणि संचार प्रणालीचं नुकसान झालं तरी स्थानिक तुकड्यांना स्वतंत्रपणे लढता येईल अशी व्यवस्था करण्यात आली होती. तसेच इराणने इराक आणि अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेने केलेल्या युद्धाचा व्यापकपणे अभ्यास केला आणि त्यानुसार रणनीती आखली.
3 / 6
इराणकडून हल्ल्यांसाठी स्वस्तातली आणि वेगळ्या प्रकारची शस्त्रास्त्रे वापरली जात आहे. ही हत्यारे शत्रूचे पैसे आणि संयम संपवण्याचं काम करतात. इराण स्वस्तातले शाहीद ड्रोन आणि कमी पल्ल्यावर मारा करणारी क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून छोटे छोटे हल्ले करत आहे. मात्र हे हल्ले रोखण्यासाठी अमेरिका आणि इस्राइलला लाखो डॉलर खरेदी करावे लागत आहेत. या माध्यमातून युद्ध लांबवून शत्रूला अधिकाधिक रक्कम संरक्षणावर खर्च करण्यासाठी भाग पाडण्याची इराणची रणनीती आहे.
4 / 6
इराणने होर्मुझची नाकेबंदी आणि आखाती देशांवरील प्रमुख ठिकाणांवर हल्ले करत इराणने आखाती देशांसह जगभरातील अर्थव्यवस्थांना मोठा धक्का दिला आहे. आतापर्यंत केवळ २१ दिवस चाललेल्या युद्धाने जगाची चिंता वाढवली आहे. होर्मुझच्या नाकेबंदीमुळे जगभरात इंधन टंचाई जाणवू लागली आहे. त्याशिवाय इराणने अमेरिकेला सहकार्य करणाऱ्या कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती येथील तेल रिफायनरी आणि एलएनजी केंद्रावर हल्ले सुरू ठेवले आहेत. त्यामुळे एलएनजीचं उत्पादन कमी झालं आहे. तसेच याचे दुष्परिणाम जगावर होताना दिसत आहे. इराणच्या या खेळीमुळे हे युद्ध कमालीचं महागडणं होण्याची शक्यता असून, ते दीर्घकाळ सुरू ठेवणं कठीण होणार आहे.
5 / 6
आतापर्यंतच्या संघर्षात अमेरिका आणि इस्राइलने केलेल्या हल्ल्यात इराणचे अनेक बडे नेते मागले गेले आहेत. मात्र जोपर्यंत शत्रूला आपल्या आक्रमकतेचा पश्चात्ताप होत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू, असा इशारा इराणच्या उर्वरित नेत्यांनी दिला आहे. जोपर्यंत आपल्या अटी मानल्या जात नाही तोपर्यंत तोपर्यंत हे युद्ध न थांबवण्याची तयारी इराणने केली आहे. त्यामुळे अमेरिका आणि इस्राइलच्या हल्ल्यांमुळे इराण काही दिवसांतच शरणागती पत्करेल आणि युद्ध लवकरच संपेल, असा वर्तवण्यात येत असलेला अंदाज साफ चुकला आहे.
6 / 6
अयातुल्लाह अली खामेनेई यांच्यासह अनेक बड्या नेत्यांच्या झालेल्या हत्येच्या घटनांमधून इराणने य मृत्यूच्या माध्यमातून ऐक्याचा संदेश दिला आहे. तसेच यामाध्यमातून देशातील जनता एकत्र येईल, असा इराणमधील शिल्लक नेत्यांना विश्वास आहे. बाहेरील देशांकडून होत असलेले हल्ले हे राष्ट्राच्या सन्मानावर होत असलेले हल्ले असल्याचे सांगत इराणमधील नेतृत्व जनतेमध्ये एकजूट घडवून आणत आहे. तसेच आखातामधील इराणचा प्रभाव कायम राहावा यासाठी हिजबुल्लाह, हुती यांसारख्या इराणच्या प्रॉक्सी गटांना सक्रिय केलं जात आहे.
टॅग्स :IranइराणWarयुद्धUnited StatesअमेरिकाIsraelइस्रायलInternationalआंतरराष्ट्रीय